"फेसबुक लाईक फार्म्स" - तुम्हाला माहित आहेत का ?


1 लाईक = 1 प्रेयर,
अगर आप सच्चे हिंदू है तो इस गोमाता के फोटो को शेअर या लाईक करे,
देखते है कितने लाईक्स और शेअर्स मिलते है भारतीय जवानो के इस फोटो को,
इस गुमशुदा लडकी के फोटो को इतना शेअर करे की उसके माता-पिता तक ये पोस्ट पहोच जाये,
इस पोस्ट को इतना शेअर करो की भारत के प्रधानमंत्री तक पोहोच जाये,
दम है तो इसे solve करके दिखाओ,
इस फोटो को क्लिक और शेअर करो फिर देखो क्या कमाल होता है ..............

मित्रांनो, वर लिहिलेल्या ओळी ओळखीच्या वाटतात ना ? फेसबुकवर दररोज असे लाखो मेसेज फिरत असतात आणि बरयाच वेळा तुम्ही कळत-नकळत त्यांना लाईक किंवा शेअर केलं असेलही.....मित्रांनो वरकरणी निरुपद्रवी वाटणारे हे फेसबुक मेसेजेस म्हणजे एक Scam आहे आणि त्याचं नाव आहे "फेसबुक लाईक फार्म्स".

फेसबुक लाईक फार्म्स म्हणजे नक्की काय ?

फेसबुक मध्ये अनेक खोटे पेजेस तयार केले जातात आणि त्यावर असे भावनांना हात घालणारे "Viral" मेसेजेस पोस्ट केले जातात. उद्देश एवढाच की जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर्स मिळवायचे. तुम्ही विचाराल यात कसला आलाय Scam ?

कसं आहे, फेसबुक मध्ये ज्यां पेजेसना जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर्स मिळतात तेवढी त्या पेजेसची किंमत वाढते. किंमत वाढते म्हणजे त्या पेजेसवरील पोस्ट आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि जास्त वेळ फेसबुकच्या टाईमलाईन वर राहतात.

त्यामुळे अशा पेजेसची Marketing Value खूप वाढते. १००००० पेक्षा अधिक लाईक्स असलेल्या पेजेसची काळ्या-बाजारात सुमारे १००० ते १००००० डॉलर्स इतकी किमत असते. वेगवेगळे brands असे पेजेस विकत घेतात, त्यावरील जुन्या पोस्ट काढून टाकतात आणि स्वत:च्या brand चे पोस्टस त्यावर लिहितात....झाले तर मग कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत brand पोहोचतो.

एवढंच नव्हे तर कधी हे पेजेस व्हायरस किंवा स्पॅम पसरवण्यासाठी देखील वापरले जातात...आणि लाईक करणारया तुमच्या आमच्या सारख्या भोळ्या लोकांचा डेटाबेस जमवण्यासाठी देखील असे पेजेस बनवले जातात.

कधी विचार केला होतात तुम्ही की या निरुपद्रवी वाटणाऱ्या पोस्टस मुळे आपण काही चोरांना खूप पैसे मिळवून देतो आहोत ? तेव्हा मित्रांनो "उचलला माउस आणि लाईक्सचा पाउस" असं करू नका....विचार करून आणि नीट पारखूनच पोस्ट्स लाईक किंवा शेअर करा.

काही टिप्स - 

१. जर पोस्ट एखाद्या अधिकृत वृत्तपत्र किंवा वाहिनीच्या पेजवरून आलेली असेल तरच ती शेअर करा.
२. उगाच भाऊक होऊ नका. फेसबुकवर लाईक करून कोणाचा जीव वाचवता येत नाही.
3. ज्या पेजवरून पोस्ट आली आहे त्या पेजच्या इतर पोस्ट पहा...त्या पोस्टही अशाच प्रकारच्या असतील तर त्या पेजपासून दूरच रहा.
4. ज्यां पोस्टमध्ये आवर्जून लाईक करा किंवा शेअर करा असं लिहिलं असेल तर आवर्जून दुर्लक्ष करा.

जाता जाता आणखी एक - 

मध्यंतरी निखील वागळे यांच एक ट्वीट सोशल मिडीया वर फिरत होतं. त्यात वागळे यांनी असे लिहिलेलं की जर मोदी पंतप्रधान झाले तर वागळे रस्त्यावर नग्न फिरतील. ही पोस्ट बऱ्याच जणांनी फॉरवर्ड केली पण कुणी हे तपासाण्याची तसदी घेतली नाही की खरेच वागळे असे म्हंटले होते का? ते ट्वीट वागळे याच्या नावाने कोणी दुसऱ्याच व्यक्तीने लिहिले होते. त्यांच्या ट्वीटर युजरनेम कडे नीट पाहिल्यास हे लगेच लक्षात येते. परंतु कोणीही ते पाहिले नाही.अशी अनेक उदाहरणे देता येतील. फेसबुकची एक पोस्ट कोणाचा बळी घेऊ शकते, जातीय दंगली घडवू शकते आणि कोणाचं करीअर संपवून टाकू शकते. तेव्हा हे हत्यार जरा जपूनच वापरा.

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला तरी चालेल !........हि हि ही.......:-)

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"फेसबुक लाईक फार्म्स" - तुम्हाला माहित आहेत का ? "फेसबुक लाईक फार्म्स" - तुम्हाला माहित आहेत का ? Reviewed by Salil Chaudhary on 11:15 Rating: 5
Powered by Blogger.