शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन बाजारपेठ


फ्लिपकार्ट, एमेझोन, स्नॅपडील या ओनलाईन विक्री करणार्‍या वेबसाईट्स मार्केटप्लेसया तत्वावर काम करतात म्हणजे मालाची विक्री करणारा विक्रेता कोणी वेगळाच असतो. हा विक्रेता केवळ या वेबसाईट्सचा वापर बाजारपेठ म्हणून करत असतो. वर दिलेल्या साईट्सवर आपण जेव्हा काही खरेदी करतो तेव्हा आपण त्या वस्तू बाजारपेठेतील विक्रेत्यांकडून घेत असतो , फ्लिपकार्ट, एमेझोन, स्नॅपडील या ओनलाईन विक्री करणार्‍या वेबसाईट्स कडून नव्हे.

अशीच एक बाजारपेठ आता भारतीय पोस्ट खाते देखील घेऊन येत आहे. आणि ही ऑनलाइन बाजारपेठ असणार आहे शेतकऱ्यांसाठी . भारतीय पोस्ट खात्याच्या या नव्या योजनेनुसार शेतकऱ्यांना धान्य, कापूस आणि इतर शेतमालाची विक्री आता डायरेक्ट व्यापाऱ्यांना करता येणार आहे. मुख्य म्हणजे ही विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना एकाही पैसा मोजावा लागणार नाही.

प्रत्येक गावासाठी नेमून दिलेला पोस्टमास्तर शेतमालाची माहिती, फोटो आणि किंमतीसहित पोस्ट खात्याच्या ऑनलाईन विक्रीसाठी बनविण्यात आलेल्या वेबसाईटवर भरणार आणि त्यानंतर ती माहिती पाहून घाउक व्यापारी तो माल विकत घेणार. याकामी शेतकऱ्यांना एकाही पैसा मोजावा लागणार नाही मात्र व्यापार्यांना काही कमिशन पोस्ट खात्याला द्यावे लागणार आहे. या व्यवहारात शेतमालाची दळणवळण करण्याची जबाबदारी पोस्ट खात्याची असून त्यासाठीचा खर्चदेखील व्यापार्यांकडूनच घेतला जाणार आहे.


सध्या प्रायोगिक तत्वावर हे प्रोजेक्ट तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात राबवण्यात येत आहे आणि त्याच्या याशापयशावर पुढे ते केव्हा आणि कुठे राबवण्यात येईल हे पोस्ट खाते ठरवेल. इंटरनेट , ईमेल, आणि मोबाईलच्या अतिप्रचंड प्रगतीमुळे सध्या पोस्ट खात्याला स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे . पोस्ट खाते स्वत:ला टिकविण्यासाठी असे अनेक उपक्रम हाती घेत आहे ही खरच स्तुत्य बाब आहे आणि याकामी शेतकऱ्यांना फायदा होतोय ही त्याहीपेक्षा आनंदाची बाब आहे.

प्रधानमंत्रींनी सुरु केलेल्या "डिजिटल इंडीया"चा फायदा "फिजिकल भारताला" होणे यातच या योजनेचे साफल्य आहे.

[स्त्रोत]

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन बाजारपेठ Reviewed by Salil Chaudhary on 10:21 Rating: 5
Powered by Blogger.