Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Bobble App

Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Netbhet.com
नमस्कार वाचकहो, आजकाल सेल्फी हा छायाचित्रप्रकार प्रचंड लोकप्रिय झालाय, प्रत्येकाला वेड लागलंय असचं म्हणा हवं तर. जो तो उठ सुठ सेल्फी काढून पोस्ट करत असतो त्यातही अनेक जण ओठांचा चंबू (pout)करून, चेहेरा वेडावाकडा करून सेल्फीद्वारे आपल्या भावभावना प्रकट करतात. आज आपण त्याच्याही पुढची पायरी बघणार आहोत म्हणजे आपल्या एकाच सेल्फीमधून वेगवेगळ्या चित्रांद्वारे आपण वेगवेगळे हावभाव दाखवू शकतो. Bobble App (बॉबल अॅप) ह्या चकटफू अॅपच्या माध्यमातून आपण तसं करू शकतो. थोडक्यात आपण आपल्या निरनिराळ्या भावनांची व्यंगचित्रे बनवू शकतो. कसं ते पाहुयात..

अ) सर्वप्रथम Bobble App (बॉबल अॅप) गुगल प्ले स्टोर वरून आपल्या फोन मध्ये उतरवून घ्या.
किंवा ह्या दुव्याद्वारे संगणकावर किंवा फोनमध्ये उतरवून घ्या.

ब) आता अॅप सुरु करा आणी व्यंगचित्रांसाठी सुरुवातीला आवश्यक (One Time Activity) असणाऱ्या  काही बाबींची पूर्तता केल्यावर  Bobble App तुमच्यासाठी एकापेक्षा एक व्यंगचित्रे बनवून देईल.

यासाठी खाली दिलेल्या सुचनांप्रमाणे एक एक पायरी कृती करा.. याची कल्पना येण्यासाठी त्याबरोबर चित्रे देखील दिली आहेत.

१) अॅप सुरु केल्यावर Bobble व्यंगचित्राचे एक उदाहरण दिसेल, त्याखालील LET’S BOBBLE या पर्यायावर टिचकी द्या.
Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Netbhet.com
२) अॅपला व्यंगचित्र (ज्याला App मध्ये Sticker असे म्हणले आहे, सोयीसाठी आपणही तेच म्हणू) तयार करण्यासाठी आपला एक फोटो लागेल, यासाठी सेल्फी कॅमेरा सुरु होईल. आपण आधीच काढलेल्या सेल्फिंपैकी एखादा फोटो देखील देऊ शकतो. इथे मी तेच केले आहे यासाठी डाव्या बाजूला असलेल्या मेन्यू वर टिचकी द्या आणी गॅलेरी मध्ये असलेला तुमचा एक झकास फोटोवर टिचकी द्या.
(पहिले बटन गॅलेरी मधील फोटो घेण्यासाठी, दुसरे बटन कॅमेरा मधून फोटो काढण्यासाठी, तिसरे बटन कॅमेरा बदलण्यासाठी Front Camera / Back Camera)

३) आता फोटो मधूनही आपल्याला फक्त आपला चेहेरा द्यायचा आहे, त्यामुळे स्क्रीन वरील फ्रेम फक्त चेहेर्यावर येईल याप्रमाणे हलवा. हि फ्रेम तुम्ही चेहेऱ्याच्या आकारानुसार कमी जास्त करू शकता किंवा तिची जागा हलवू शकता. फ्रेम सेट केल्यावर खाली Male किंवा Female निवडा आणी स्क्रीन वरील उजव्या कोपऱ्यातील टीकेवर टिचकी द्या.

४) आता चेहरा निट दिसण्यासाठी फोटोमधील डोळ्यांची जागा सेट करा यासाठी दिसतं असलेली दोन वर्तुळं बरोबर प्रत्येक डोळ्याच्या मध्यभागी सरकवून ठेवा आणी पुन्हा एकदा स्क्रीन वरील उजव्या कोपऱ्यातील टीकेवर टिचकी द्या.
Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Netbhet.com


५) आता App आपला चेहेरा नीट ओळखेल आणी चेहेर्याचे स्टीकर बनवेल, पण तरीही काही अनावश्यक भाग त्यात येऊ शकतो तो बोटाने पुसून टाका

६) या स्टीकर मध्ये जर मान किंवा गळा आला असेल तर तोही पुसून टाका आणी फक्त चेहेरा ठेवा आता स्क्रीन वरील उजव्या कोपऱ्यातील DONE बटणावर टिचकी द्या.

७) आता तयार झालेले चेहेर्याचे स्टीकर, दिसतं असलेल्या धडाच्या स्टीकरवर सरकवून ठेवा.
Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Netbhet.com

८) चेहेरा आणी धड हे एकसंध दिसल्यावर पुन्हा एकदा स्क्रीन वरील उजव्या कोपऱ्यातील टीकेवर टिचकी द्या. जर स्टीकर तुम्हाला आवडले नाही किंवा काहीतरी वेगळचं तयार झालंय असं वाटलं तर स्क्रीन वरील डाव्या  कोपऱ्यातील बाणावर टिचकी द्या आणी पुन्हा नवीन फोटो घेऊन वरील कृती नव्याने करा.

९) वूहू.. इथे आपल्याकडून सगळे सोपस्कार पूर्ण झाले आहेत, यापुढील काम App आपल्यासाठी करेल. इथून पुढे दर वेळी App सुरु केल्यावर थेट हि खिडकी दिसेल.

१०) आता Sticker या पर्यायावर टिचकी द्या आणी App ने तयार केलेले स्टीकर्स पहा. वेगवेगळ्या भावना, लोकप्रिय झालेले डायलॉग्ज आणी वेगवेगळे नमुने तुम्हाला दिसतील. इंटरनेट सुरु असेल तर यात आपोआप दिवसागणिक नवीन स्टीकर्स जोडले जातील.
Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Netbhet.com

११) तुम्हाला आवडलेले कोणतेही स्टीकर शेयर करण्यासाठी त्या स्टीकर वर एक टिचकी द्या अनेक पर्याय समोर दिसतील उदाहरणार्थ Set As Facebook Profile Picture, Save in Gallery, Set As Wallpaper, Share on Whats App इत्यादी..

१२) या स्टीकर्स मध्ये आपण स्वतःची ओळ देखील लिहू शकतो यासाठी Make your own sticker वर टिचकी द्या आणी स्वतःची ओळ लिहून त्या ओळी समोरच्या खुणेवर टिचकी द्या.

१३) Bobble App वापरून आपण चिंटू सारख्या गोष्टी पण तयार करू शकतो (मराठीतूनही). यासाठी मेन स्क्रीन वर या (स्क्रीनवरील डाव्या कोपऱ्यातील बाणावर टिचकी द्या.)
Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Netbhet.com

१४) आता स्टोरीज या पर्यायावर टिचकी द्या, सुरुवातीला एक दोन स्टोरीज दिसतील पण जर इंटरनेट सुरु असेल तर यात एक एक जोडल्या जातील. तुम्हाला आवडलेल्या एखाद्या स्टोरीवर टिचकी द्या.

१५) आता वाक्य बदलण्यासाठी वाक्यांवर आणी चेहेरे बदलण्यासाठी चेहेर्यावर टिचकी द्या. App मध्ये आधीपासूनच अनेक लोकप्रिय चेहेर्यांचे स्टीकर्स तयार आहेत क्रमांक १८ चे चित्र पहा (अर्थात ते इंटरनेट द्वारे आपोआप जोडले जातील त्यामुळे सुरुवातीला जास्त स्टीकर्स दिसणार नाहीत). मेन स्क्रीनवरील तुम्ही पहिल्या वेळी तयार केलेल्या चेहेर्यावर टिचकी देऊन तुम्ही त्यात इतरही चेहेरे जोडू शकता म्हणजे मित्रमैत्रिणी वैगेरे यासाठी वर दिलेल्या कृतीमधील १ ते ८ पायऱ्या पूर्ण करा. स्टोरी तयार झाल्यावर स्क्रीन वरील उजव्या कोपऱ्यातील बरोबरच्या खुणेवर टिचकी देऊन तुम्ही ती सेव्ह करू शकता.

१६) App मधला तिसरा आणी शेवटचा पर्याय आहे Canvas जो जवळपास स्टोरीज या पर्यायासार्खाच आहे पण त्यात आपल्या एकट्याचे स्टीकर दिसते आणी शरीराची जाडी, कपडे, Background आणी वाक्य या गोष्टी बदलता येतात.
Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Netbhet.com
१७) Canvas मध्ये जी गोष्ट बदलायची आहे त्या गोष्टीच्या आयकॉन वर टिचकी द्या (Canvas या पानावर त्या शब्दाखाली हे चार आयकॉन्स दिसतील) आणी ती गोष्ट बदलण्यासाठी स्क्रीन वर उजवीकडून डावीकडे बोटाने स्लाईड करा (जसं आपण गॅलेरी मध्ये पुढचा फोटो बघतो तसं).

तळटीप - Bobble App अॅपल फोन्स साठी देखील उपलब्ध आहे पण बहुतांश स्मार्टफोन धारक Android फोन वापरत असल्यामुळे Android फोनवापरकर्त्यांना उद्देशून हा लेख लिहिला आहे. अॅपल फोन्स साठी Bobble App इथून डाउनलोड करा. 

तर अशा पद्धतीने आपण आपली व्यंगचित्रे बनवू शकतो. इंटरनेट सुरु असेल तर अनेक स्टीकर्स आपोआप जोडले जातात आणी Bobble App सुरु असताना What’s App सुरु केले तर तिथेही हि Bobble App चा एक छोटा आयकॉन दिसतो जेणेकरून तुम्ही हि स्टीकर्स झटपट शेयर करू शकता. काही अडचण आली तर इथे नक्की मांडा, पुन्हा भेटूच नवीन विषयासह..!!


+ यशोधन वाळिंबे

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Bobble App Android वर बनवा स्वतःची व्यंगचित्रे - Bobble App Reviewed by Salil Chaudhary on 23:14 Rating: 5
Powered by Blogger.