आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख

वाचक मित्रांनो नमस्कार, आपल्याला कोणीही आपला ई-मेल पत्ता विचारला कि आपण आपला वर्षानुवर्षे
वापरत असलेला ई-मेल पत्ता देतो आणी माझ्या ओळखीतील आणी Contacts मधील बहुतांश ई-मेल पत्ते हे 
शेवटी @gmail.com ने संपतात, माझाही ई-मेल पत्ता त्याला अपवाद नाही आहे त्याला कारणही तसचं आहे, 
गुगलने राखलेला दर्जा आणी गुगलची इतर जवळपास प्रत्येक सेवा वापरण्यासाठी मोठ्या खुबीने निर्माण 
केलेली Gmail अकाऊंट असण्याची गरज, म्हणजे गुगलची कोणतीही प्रमुख सेवा वापरायची असेल तर 
आपल्याकडे गुगल खाते (पर्यायाने Gmail खाते) असलेच पाहिजे.

आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख


जवळपास सगळ्याच कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना त्या त्या कंपनीचे डोमेन असलेला ई-मेल पत्ता दिला जातो
(उदाहरणार्थ – AmukTamuk@dell.com, AmukTamuk@ZeeNetwork.com इत्यादी), स्वतःचे डोमेन नेम
असेल तर आपल्यालाही असा पत्ता तयार करता येतो. थोडक्यात काय तर आपला ई-मेल पत्ता ही आपली
ओळख आहे.

आज आपण अशा एका चकटफू ई-मेल सेवेबद्दल माहिती घेणार आहोत जिथे आपल्याला ई-मेल पत्त्यासाठी
एकापेक्षा एक सरस पर्याय उपलब्ध आहेत. Mail.com ह्या संकेतस्थळावर अशी सेवा उपलब्ध आहे. तुम्ही जर
व्यवसायाने डॉक्टर असाल तर तुम्ही amte@Dr.com हा किंवा amte@doctor.com हा ई-मेल पत्ता निवडू
शकता. तुम्ही जर व्यवसायाने समुपदेशक असाल तर तुम्ही Swapnil@Consultant.com हा ई-मेल पत्ता निवडू
शकता. ह्याचप्रमाणे तुम्ही जर सध्या लंडन मध्ये राहत असाल किंवा ते शहर तुम्हाला आवडत असेल तर
तुम्ही Sachin@London.com हा पत्ता निवडू शकता, अशाच प्रकारे तुम्ही जर व्यवसायाने अभियंते असलात
तर तुम्ही Salil@engineer.com हा ई-मेल पत्ता निवडू शकता. Mail.com ह्या संकेतस्थळावर ई-मेल
पत्त्यांसाठी असे सुमारे २०० च्या आसपास पर्याय उपलब्ध आहेत ज्यात देश, व्यवसाय, धर्म, आवडी-निवडी
आणी अशाच इतर गोष्टींशी निगडीत ई-मेल पर्याय उपलब्ध आहेत त्यातले काही विशेष पत्ते म्हणजे

 @usa.com, @mail.com, @ email.com, @ post.com, @ usa.com, @ japan.com, @chef.net, @clerk.com, @doctor.com, @dr.com, @engineer.com, @lawyer.com, @minister.com, @photographer.net, @tvstar.com, @europe.com, @yours.com, @sister.com, @secretary.net  इत्यादी.

Mail.com वर आपल्या आवडीच्या ई-मेल पत्त्यासह खाते कसे उघडायचे हे बघुयात..

१)    सर्वप्रथम http://www.mail.com ह्या दुव्यावर टिचकी द्या. मेल.कॉम चे मुखपृष्ठ उघडेल (बहुतांश वेळेस
बहुतेकांना मुखपृष्ठावरच gmail.com ची जाहिरात दिसणं हा योगायोग नसून गुगलच्या मुत्सद्दी जाहिरात
रणनीतीचा भाग झाला, असो) आता पानाच्या वरील उजव्या कोपर्यात Search आणी Log in ह्या दोन
पर्यायांमध्ये Sign up हा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.

आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख२)    आता आपण कोणत्याही संकेतस्थळावर सदस्य बनताना भरतो तसा एक फॉर्म दिसेल. त्यात तुमची
माहिती लिहा. Desired Email Address ह्या रकान्यात तुम्हाला हवा असलेला ई-मेल पत्ता लिहा, म्हणजे
पत्त्यामधील @ च्या अलीकडील भाग. एक चांगली बातमी म्हणजे इथली मर्यादा फक्त ३ कॅरेक्टर्सची आहे
आणी त्याहून चांगली बातमी म्हणजे बहुतांश ईमेल पत्ते ३ कॅरेक्टर्स मध्ये अजूनही उपलब्ध आहेत. इथे ई-मेल
पत्ता नोंदवताना मी nbt@dr.com हा नोंदवत आहे. तुम्ही पत्ता लिहून झाल्यावर @ च्या पुढे जो पत्ता हवाय तो
निवडा, यासाठी दिसतं त्यासमोर असलेल्या mail.com वर टिचकी द्या आणी आवडेल त्या पत्त्यावर टिचकी
द्या. पुढे जाण्याआधी तो पत्ता उपलब्ध आहे ह्याची खात्री करा यासाठी त्याच्या समोर दिसतं असलेल्या
बरोबरच्या खुणेवर टिचकी द्या. तुम्ही दिलेला पत्ता उपलब्ध असेल तर “तुमचा पत्ता” is available असे दिसेल
अन्यथा तुम्हाला इतर पर्याय सुचवले जातील.

आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख


३)    अशाचं प्रकारे इतरही रकाने भरून सगळ्यात शेवटी Verify Your Registration च्या जागी तुम्ही

मनुष्यप्राणी आहात हे सिद्ध करा (काय दिवसं आलेत). Spammers नी सॉफ्टवेअरचा वापर करून असे सारखे
अनेक ई-मेल पत्ते तयार करू नयेत म्हणून म्हणून हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. नोंदणी Verify करण्यासाठी
फक्त I’m not a robot च्या आधी असलेल्या चौकोनावर टिचकी देऊन टिक करा (mail.com ला जर तुमचा
संशय आला तर इथे तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल, उदाहरणार्थ – दिलेल्या चार चित्रांपैकी कारचे चित्र
कोणते?) असे पहिलीतल्या मुलालाही उत्तरं देता येईल इतके टाईमपास प्रश्न विचारतील. सारं काही
Verification साठी..

आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख

४)    सर्व काही भरून झाल्यावर “I Accept. Create My Account.” वर टिचकी द्या. सगळी प्रक्रिया व्यवस्थित
पार पडली तर तुम्हाला तुमच्या नवीन खात्याची माहिती दिसेल (जी तुम्ही हवी असल्यास प्रिंट काढून ठेवू
शकता). आता Continue to inbox वर टिचकी द्या.

आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख


५)    Mail.com हे विनामुल्य (free) आणी सःशुल्क (paid) अशा दोन्ही प्रकारात वापरता येत असल्यामुळे इथे
सःशुल्क सेवेबद्दल माहिती दिसेल. विनामुल्य वापरायचे असल्यास No thanks, go to mail.com असा
स्क्रीनच्या खाली डाव्या कोपर्यात छोट्या अक्षरांतील दुवा दिसेल त्यावर टिचकी द्या.

आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख


६)    आता आपल्याला आपला इनबॉक्स दिसेल. जसे पर्याय इतर ई-मेल सेवा पुरवठादार देतात तसेच इथे
वेगवेगळे पर्याय दिसतील. आपण विनामुल्य सेवा वापरत असल्यामुळे जाहिराती देखील दिसतील.

आपण Mail.com वरील खाते Android किंवा Apple फोनवरून देखील वापरू शकतो, त्यासाठी संबंधित
अॅप्सचे दुवे देखील डाव्या बाजूच्या पर्यायांमध्ये दिसतील. Mail.com चे वैशिष्ट्य म्हणजे इथे अमर्यादित ई-
मेल साठवता येतात. एका ई-मेल मध्ये ५० एम.बी पर्यंत फाईल्स जोडता येतात तसेच Mail.com खात्यावर २
जी.बी पर्यंत फाईल्स साठवता येतात. (Per Email Maximum 50 MB , Overall 2 GB per account). डाव्या
बाजूला दिसत असलेल्या Alias Addresses ह्या पर्यायामध्ये आपण एकाच खात्यामध्ये १० वेगवेगळे ई-मेल
पत्ते तयार करू शकतो .आपला ई-मेल पत्ता, आपली ओळखविशेष सूचना – १९९५ पासून निर्माण केलेली Brand ईमेज टिकवण्यासाठी अशी काही शक्यता नसली तरीही
उपलब्ध ई-मेल पत्त्यांपैकी कोणतेही डोमेन रद्द करण्याचा अधिकार Mail.com ने राखून ठेवला आहे याचा अर्थ
सःशुल्क वापरकर्त्यांसाठी देखील कोणतेही डोमेन आणी त्याच्या अंतर्गत रजिस्टर केलेले ई-मेल पत्ते रद्द
Mail.com करू शकते. वापरकर्त्यांची संख्या आणी Mail.com ची लोकप्रियता बघता असं काही होण्याची
शक्यता कमी असली तरी तसा अधिकार त्यांच्याकडे आहे हे लक्षात घेणं महत्वाचे.

काही अडचण उद्भवली तर इथे नक्की मांडा.. पुन्हा भेटूच, नवा विषय आणी नव्या लेखासह..!!+ यशोधन वाळिंबे

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख आपला ई-मेल पत्ता, आपली ओळख Reviewed by Salil Chaudhary on 06:29 Rating: 5
Powered by Blogger.