C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग २

नमस्कार वाचकहो, आपण गेल्या भागामध्ये सी.क्लीनर चा मुख्य उपयोग आणी प्रमुख दोन पर्यायांबद्दल माहिती घेतली. हा त्या लेखाचा पुढचा आणी शेवटचा भाग आहे, पहिला भाग वाचण्यासाठी या दुव्यावर टिचकी द्या.  सी.क्लीनरने नव्या आवृतींमध्ये काही अजून सुविधा पुरवल्या आहेत त्याही आज आपण पाहुयात.


C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग २


३) टूल्स (Tools) – फाईल्स आणी प्रोग्राम्सशी संबंधित हत्यारे या पर्यायात सापडतील. त्याची माहिती आपण एक एक करून घेऊ. टूल्स या पर्यायाखाली ६ उपपर्याय दिले आहेत ते खालीलप्रमाणे..

# अनइन्स्टॉल (Uninstall) – संगणकावर प्रस्थापित केलेल्या संगणक प्रणाली दुरुस्त किंवा काढून टाकण्यासाठी हा उपपर्याय दिला आहे. कंट्रोल पॅनल मधल्या Add or Remove Programs सारखाच हा उपपर्याय आहे.

# स्टार्टअप (Startup) – संगणक सुरु झाल्यावर काही प्रोग्राम्स हे आपोआप सुरु होतात ते दर वेळी आपल्याला आवश्यक असतातच असे नाही पण दर वेळी सुरु होऊन संगणकाचा वेग मंदावतो त्यामुळे अशा प्रोग्राम्स ना नियंत्रित करण्यासाठी हा उपपर्याय दिला आहे. जो प्रोग्राम आपण दर वेळी वापरत नाही त्याचे आपोआप सुरु होणे बंद करू शकतो. त्या प्रोग्रामवर टिचकी देऊन उजव्या बाजूला दिसतं असलेल्या पर्यायांमध्ये Disable या पर्यायावर टिचकी द्या.

C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग २


# डिस्क एनलायझर (Disk Analyzer) – या उपपर्यायामध्ये कोणत्या प्रकारच्या फाईल्सनी कोणत्या ड्राईव्हची किती जागा व्यापली आहे हे दिसते. थोडक्यात एखाद्या ड्राईव्ह वर किती छायाचित्रे, गाणी, चलचित्रे आहेत हे पाहण्यासाठी हा पर्याय दिला आहे. हा उपपर्याय कसा वापरावा यासाठी इथे दिलेले हे चित्रं पहा


C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग २


 # डुप्लीकेट फाइंडर (Duplicate Finder) – आपल्या संगणकात एक फाईल दोन किंवा जास्त ठिकाणी असू शकते, त्यामुळे डिस्क वरील जागा अनावश्यकपणे अडून राहते (backup चा अपवाद वगळता).. अशा डुप्लीकेट फाईल्स शोधण्यासाठी हा उपपर्याय दिला आहे, अशा फाईल्स शोधण्यासाठी नाव, आकार, तारीख आणी मजकूर असे निकष आपण लावू शकतो. डुप्लीकेट फाईल्स सापडल्यावर त्यातील एक फाईल ठेवून इतर फाईल्स डिलीट करायच्या की नाही हे आपण नंतर ठरवू शकतो म्हणजे आपल्याला विचारल्याशिवाय डुप्लीकेट फाईल्स डिलीट केल्या जात नाहीत. हा उपपर्याय कसा वापरावा यासाठी इथे दिलेले हे चित्रं पहा.


C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग २


# सिस्टीम रिस्टोर (System Restore) – आपला संगणक काही प्रोग्राम्स इन्स्टॉल करायच्या आधी सिस्टीम रिस्टोर पॉईंट तयार करतो म्हणजे नंतर जर काही गडबड झाली तर आपण संगणक पुन्हा पूर्ववत करू शकतो त्यामुळे त्या सिस्टीम रिस्टोर पॉईंट नंतरचे सर्व बदल रद्द होऊन सिस्टीम रिस्टोर पॉईंट तयार करेपर्यंत संगणक ज्या स्थितीत होता त्या स्थितीत पुन्हा आणून ठेवतो. हे सिस्टीम रिस्टोर पॉईंटस् आपण या उपपर्यायात बघू शकतो आणी आवश्यकता नसल्यास डिलीट करू शकतो. संगणकात एक तरी नवीनतम सिस्टीम रिस्टोर पॉईंट असणे कधीही चांगले.

# ड्राईव्ह वायपर (Drive Wiper) – आपण आधीच्या लेखात बघितल्याप्रमाणे हा उपयुक्त पण तसाच वेळखाऊ उपपर्याय आहे त्यामुळे ६ महिन्यातुन एकदा वापरायला हरकत नाही. इथे चित्रात दिल्याप्रमाणे WIPE ह्या शब्दापुढे दिलेल्या रकान्यात Free Space Only हा पर्याय निवडल्याची १० वेळा खात्री करा अन्यथा खाली निवडलेल्या ड्राईव्ह मधील सर्व माहिती डिलीट होईल थोडक्यात निवडलेले ड्राईव्ह Format होतील.


C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग २


४) ऑप्शन्स (Options) – इथे इतर गोष्टींशी निगडीत ७ उपपर्याय दिले आहेत.

# सेटींग्स (Settings) – या उपपर्यायात संगणक सुरु होताना सी-क्लीनर सुरु होईल असा पर्याय निवडता येतो. यासाठी Run CCleaner when computer starts च्या आधी असलेल्या चौकोनावर टिचकी द्या. याचा फायदा म्हणजे संगणकावरील कचरा प्रत्येक वेळी संगणक सुरु झाल्यावर स्वच्छ केला जाईल आणी अनावश्यक फाईल्स काढून टाकल्या जातील.

# कुकीज (Cookies) – आपण ज्या वेबसाईट्स पाहतो त्या आपल्या संगणकावर कुकीज डाउनलोड करतात ज्यामुळे ते आपला ठावठिकाणा, आपल्या संगणकाची माहिती त्या संकेतस्थळांना मिळते. उदाहरणार्थ गुगल अशा कुकीज चा वापर करून आपल्याला आपल्या आवडीच्या निगडीत जाहिराती दाखवते, याशिवाय संकेतस्थळांकडून कुकीजचे इतरही उपयोग केले जातात. सी-क्लीनर वापरून आपण ह्या कुकीज डिलीट करू शकतो (अर्थात त्यानंतर पुन्हा जर का ते संकेतस्थळावर आपण गेलो तर ते संकेतस्थळ त्या कुकीज पुन्हा आपल्या संगणकावर पाठवते), वरच्या उपपर्यायात बघितल्याप्रमाणे जर सी-क्लीनर ओटो स्टार्ट मोड मध्ये ठेवला तर अशा कुकीज आपोआप डिलीट होतील. पुन्हा संकेतस्थळ कुकीज पाठवेल आणी सी-क्लीनर पुन्हा त्या कुकीज डिलीट करेल (हे चक्र असचं सुरु राहील, आणी मुख्य म्हणजे आपला संगणक स्वच्छ राहील)..  कुकीज ह्या उपपर्यायात कोणत्या कुकीज संगणकावर ठेवायच्या आणी कोणत्या डिलीट करायच्या याबद्दल सी-क्लीनरला आपण सूचना देऊ शकतो.

# इन्क्लुड (Include) – या उपपर्यायात कोणती फोल्डर्स आपल्याला रिकामी ठेवायची आहेत ह्याबद्दल आपण सूचना देऊ शकतो. उदाहरणार्थ – TEMP ह्या फोल्डर मध्ये असलेल्या किंवा येणाऱ्या सर्व फाईल्स सी-क्लीनर कडून डिलीट केल्या जातील.

# एक्सक्लूड (Exclude) - या उपपर्यायात कोणती फोल्डर्स आपल्याला सुरक्षित ठेवायची आहेत ह्याबद्दल आपण सूचना देऊ शकतो. उदाहरणार्थ – My Documents ह्या फोल्डर मध्ये असलेल्या किंवा येणाऱ्या सर्व फाईल्सना सी-क्लीनर कडून कोणताही धोका नाही. याचा अर्थ My Documents या फोल्डर मध्ये येणाऱ्या टेम्पररी फाईल्स देखील सी-क्लीनर कडून स्वच्छ केल्या जाणार नाहीत.

# मॉनीटरिंग (Monitoring) – या उपपर्यायात काही प्रगत सुविधा दिल्या आहेत पण त्या सःशुल्क वापरकर्त्यांसाठी आहेत. यात जर  ठराविक क्षमतेपेक्षा जास्त कचरा तयार झाला तर सी-क्लीनर त्याबाबत माहिती देतो.

# एडव्हान्स (Advanced) – इथे ११ उपपर्याय दिले आहेत ते खालीलप्रमाणे


C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग २


# अबाउट (About) – इथे सी-क्लीनर बद्दल माहिती तसेच त्याच्याशी निगडीत दुवे दिले आहेत.

सी क्लीनर ही संगणक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक संगणकावर असायलाच हवी अशी एक उपयुक्त संगणक प्रणाली आहे. काही अडचण उद्भवली तर इथे मांडायला विसरू नका, पुन्हा भेटूच नवा विषय नवा लेख..!!


+ यशोधन वाळिंबे

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग २ C Cleaner संगणकाचा डॉक्टर - भाग २ Reviewed by Salil Chaudhary on 06:08 Rating: 5
Powered by Blogger.