ओव्हर स्मार्ट फोन येत आहेत..


आपण ठराविक स्मार्ट फोन का घेतो? सहाजिकपणे प्रत्येकाची उत्तरे वेगवेगळी असतील कारण प्रत्येकाच्या गरजा आणी आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत. ज्याला सतत गाणी ऐकायची आवड आहे ती व्यक्ती स्पीकर चांगला असणारा फोन घेते, ज्याला छायाचित्रणाची हौस आहे ती व्यक्ती चांगला कॅमेरा असणारा फोन घेते पण यांच्या फोनचा स्पीकर किंवा कॅमेरा निकामी झाला आणी तो दुरुस्त करण्याच्या पलीकडे गेला तर नवीन फोन घेण्यावाचून पर्याय उरत नाही कारण इतर सुविधा चांगल्या सुरु असूनही जे हवंय तेच निकामी झालेलं असत.

ओव्हर स्मार्ट फोन येत आहेत..


Ara Knaian, Dave Hakkens सारख्या काही जणांना इथे एक प्रश्न पडला आणी त्यादिशेने प्रयत्न सुरु झाले. तो प्रश्न म्हणजे


आता वरच्या घटनांमध्ये मोड्युलर फोन असता तर त्यात निकामी झालेले भाग उदाहरणार्थ स्पीकर किंवा कॅमेरा स्वतःचं काढून टाकून त्याजागी तसेच नवीन स्पीकर किंवा कॅमेरा बसवता येऊ शकले असते तेही मोबाईल रिपेयरिंग दुकानात न जाता.

अधिक माहितीसाठी ही चित्रफीत पहा.मोड्युलर फोन - Modular Phone म्हणजे थोडक्यात फोनच्या आकाराची एक साधी इलेक्ट्रॉनिक पट्टी ज्यावर शेकडो मोड्यूल्स मधून आपल्याला हवा तसा फोन आपण तयार करू शकतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला फक्त चांगला कॅमेरा हवा असेल तर कॅमेराचे मोड्युल विकत घ्यायचे आणी फोनवर बसवायचे अगदी बॅटरी बसवतो तसे. प्रोसेसर अपग्रेड करायचा असेल तर प्रोसेसरचे मोड्युल विकत घ्यायचे आणी फोनवर बसवायचे. रॅम किंवा स्पीकर जास्त क्षमतेचे हवे असतील तर हवे त्या कंपनीचे विकत घ्यायचे आणी फोनवर बसवायचे. स्क्रीन फुटली तर फुटलेल्या स्क्रीनचे मोड्युल काढायचे आणी नव्या स्क्रीनचे मोड्युल बसवायचे. याचा प्राथमिक फायदा म्हणजे क्षुल्लक कारणांमुळे फोन बदलावा लागू नये, यामुळे ई-कचर्याचे प्रमाण देखील कमी होईल.

आणी अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे प्रत्येकाला हवा तसा फोन बनवण्याचे स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे एक डॉक्टर त्याला उपयोगी असणारी मोड्यूल्स वापरू शकतो, एक इंजिनियर त्याला उपयुक्त असणारे मोड्यूल्स वापरू शकतो.
कशा प्रकारची मोड्यूल्स उपलब्ध होतील?


 • वातावरणाची माहिती घेण्यासाठी Weather Measurement, 
 • आपली चावी किंवा पाकीट/पर्स सारख्या गोष्टी हरवल्या तर आसपास शोध घेण्यासाठी Bluetooth Locator, 
 • अंध व्यक्तींना फोन वापरता यावा यासाठी Braille Screen module, 
 • कारमध्ये असणाऱ्या तांत्रिक समस्या ओळखण्यासाठी Car Scan module, 
 • कार कुठूनही लॉक/अनलॉक करण्यासाठी Car’s Remote Programmable module, 
 • उपलब्ध सामग्री कॅमेराने ओळखून त्यातून कोणती डिश तयार करता येईल हे सुचवणारे मोड्युल Cook Perfect module,
 •  वोल्टेज, करंट आणी इतर तांत्रिक माहिती ओळखणारे मोड्युल Digital Multimeter, 
 • रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जाणून घेण्यासाठी glucose meter module, 
 • शरीरातील ताप मोजण्यासाठी thermometer module, 
 • स्क्रीन उन्हाखाली आली कि फोन चार्ज होण्यासाठी Solar Screen Module, 
 • मायक्रोस्कोप एवजी वापरण्यासाठी Microscope Module इत्यादी इत्यादी इत्यादी इत्यादी इत्यादी आणी असे लाखो इत्यादी.. 

ही झाली काही अंशिक उदाहरणं.. प्रत्यक्षात वेगवेगळ्या कंपन्या मोड्यूल्स तयार करू शकत असल्यामुळे आज ज्याप्रमाणे प्ले-स्टोर मध्ये एप्स उपलब्ध आहेत त्याप्रमाणे  प्रत्यक्षात हजारो कंपन्यांची लाखो मोड्यूल्स उपलब्ध होतील ज्याला जे हवंय त्याने ते वापरावं पण सध्या ह्या सर्व कल्पना गर्भावस्थेत आहेत.

गुगलने यात रस दाखवला आहे आणी गेली काही वर्ष या संकल्पनेवर संशोधन सुरु आहे जे अंतिम टप्यात आले आहे. गुगलचे Project Ara या नावाने हे संशोधन Motorola बरोबर सुरु आहे तर ही भन्नाट कल्पना असल्यामुळे इतरही प्रतिस्पर्धी त्यात उतरले आहेत ज्यात PuzzlePhone, Nexpaq, Eco-Mobius यांचा समावेश आहे. गुगलच्या फोनची विक्री जरी २०१६ मध्ये सुरु होणार असली तरी इतर प्रतिस्पर्ध्यांचे फोन्स विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

गुगलच्या फोनची किंमत जाहीर झाली नसली तरी ती साधारण ५० डॉलर्स म्हणजेच रुपये.३००० पासून सुरु होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. गुगल ६ बिलियन (६०० करोड) लोकांना डोळ्यासमोर ठेवून फोन संशोधन करत आहे ज्यात सध्याचे १०० करोड स्मार्टफोन धारक, सध्याचे ५०० करोड साधे फोन धारक आणी उर्वरित १०० करोड लोक जे अजूनही फोन वापरत नाहीत अशांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी काही संकेतस्थळे

मोड्युलर फोन येण्यासाठी जरी अजून थोडा अवकाश असला तरी हे संशोधन आपल्या SmartPhone वापरामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणेल हे नक्की.


+ यशोधन वाळिंबे
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

ओव्हर स्मार्ट फोन येत आहेत.. ओव्हर स्मार्ट फोन येत आहेत.. Reviewed by Salil Chaudhary on 17:59 Rating: 5
Powered by Blogger.