आपण जीमेल मधून पाठविलेली ईमेल केव्हा वाचली गेली हे ओळखा !

मध्यंतरी एकदा माझ्या मनात विचार आला की व्हॉट्स अ‍ॅपमध्ये जसा मेसेज मिळाला आहे किंवा मेसेज वाचला गेला आहे असे दर्शविण्यासाठी दोन हिरव्या बरोबरच्या खुणा दिसतात्...अगदी तशाच जर जीमेल मध्ये पण दिसल्या तर !

आयडीया तर चांगली होती म्हणून जरा गुगल सर्च करुन पाहिलं तर खरोखरच एक अशी सेवा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. गुगलने स्वतः जीमेल मध्ये ही सुविधा दिलेली नसली तरी एक गुगल क्रोम एक्स्टेंशन उपलब्ध आहे ज्याचा वापर करुन आपण अगदी व्हॉट्स अ‍ॅप प्रमाणेच आपण पाठवलेला ईमेल मेसेज वाचला गेला की नाही हे पाहू शकतो.

खालील चित्र पाहिल्यावर मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल.


तर मित्रांनो, आपण आज ज्या गुगल क्रोम एक्स्टेंशन बद्दल जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे मेलट्रॅक. नावाप्रमाणेच ईमेल ट्रॅकींगसाठी याचा उपयोग होतो.

मेलट्रॅक हे मोफत आणि विकत अशा दोनीही प्रकारात उपलब्ध आहे. आपल्याला फार जास्त अ‍ॅडव्हान्स फीचर्सची आवश्यकता नसेल तर मोफत उपलब्ध असलेले मेलट्रॅक पुरे आहे.

खाली दिलेल्या व्हीडीओ मध्ये मेलट्रॅक कसे इंस्टॉल करायचे, जीमेल सोबत कसे जोडायचे आणि ईमेल ट्रॅक करण्यासाठी कसे वापरायचे ते मराठीत समजावून सांगीतले आहे.मित्रांनो हे नविन टूल आणि हा व्हीडीओ कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आणि हो असेच अनेक उपयोगी व्हीडीओ पाहण्यासाठी नेटभेटच्या युट्युब चॅनेलला जरुर सबस्क्राईब करा !

www.mailtrack.io

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

आपण जीमेल मधून पाठविलेली ईमेल केव्हा वाचली गेली हे ओळखा ! आपण जीमेल मधून पाठविलेली ईमेल केव्हा वाचली गेली हे ओळखा ! Reviewed by Salil Chaudhary on 05:41 Rating: 5
Powered by Blogger.