QualityTime - आपल्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण आणणारे अप्लिकेशन !


नमस्कार मंडळी, आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी वापरतो अगदी टूथब्रश पासून पायातल्या वहाणेपर्यंत.. पण सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे भ्रमणध्वनी, मोबाईल नव्हे स्मार्टफोन. आपण फोन Addict आहोत म्हणजे आपल्याला स्मार्टफोनचे व्यसन आहे असे म्हटले की आधी आपण ते नाकारतो पण आज ही वस्तूस्थिती आहे, हळू हळू फोनचे व्यसन आपला एक एक मिनिट बळकावत जाते अगदी शांतपणे. कोणाचाही फोन किंवा मेसेज आलेला नसताना स्क्रीन अनलॉक करून पाहणे, What’s App सुरु करून पाहणे ही अशी काही त्याची उदाहरणे. आज आपण अशा App बद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे आपण दिवसाला, महिन्याला किती वेळ स्मार्टफोन वापरतो कोणते एप्लिकेशन्स वापरतो याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. या एप्लिकेशनचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे या अॅपद्वारे आपण आपल्या स्मार्टफोनच्या बेताल वापरावर नियंत्रण आणू शकतो.

Quality Time – तुम्ही दररोज किती वेळ फोन वापरता?

Quality Time ह्या एप्लिकेशनद्वारे आपण आपला किती बहुमुल्य वेळ स्मार्टफोनवर खर्च करतो आणी तो कमी किंवा नियंत्रणात कसा आणायचा हे आपण पाहुयात.. हा लेख माझ्यासारख्याच तरुण मित्रांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिला आहे अर्थात त्याला काही अपवाद देखील आहेतच म्हणजे स्मार्टफोन वापरणे हा ज्यांच्या व्यवसायाचा भाग आहे त्यांनाही या अॅपद्वारे उपयुक्त Statistics मिळतील.


१) सर्वप्रथम Quality Time हे अॅप गुगल प्ले स्टोर मधून आपल्या फोनवर उतरवून घ्या.
Quality Time – तुम्ही दररोज किती वेळ फोन वापरता?

२) आता अॅप सुरु करा, हे अॅप वापरताना आपण आपले खाते देखील तयार करू शकतो किंवा त्याशिवायही अॅप वापरू शकतो त्यामुळे इथे REGISTER LATER या पर्यायावर टिचकी द्या.

३) इथे अॅप बद्दलची वैशिष्ट्ये दिसतील, फोटो बघतो त्याप्रमाणे स्क्रीन उजवीकडून डावीकडे सरकवा. आणी दिसत असलेल्या Let’s Start या बटणावर टिचकी द्या.

४) इथे अॅप नुकतेच प्रस्थापित केले असल्यामुळे कोणतीही माहिती दिसणार नाही पण इथून पुढे तुमच्या स्मार्टफोन वापराबद्दल माहिती जतन व्हायला सुरुवात होईल. यानंतर कधीही अॅप सुरु केलेत की त्या मिनिटापर्यंतची इत्यंभूत माहिती मिळेल.
Quality Time – तुम्ही दररोज किती वेळ फोन वापरता?

५) फोन वापरताना ब्रेक घेण्यासाठी आपण गजर लावू शकतो, यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या खालील उजव्या कोपर्यातील तीन आडव्या रेषांवर टिचकी द्या.

६) आता Scheduled Breaks या पर्यायावर टिचकी द्या, त्यानंतर Next या पर्यायावर टिचकी द्या.

७) इथे काही उपपर्याय दिले आहेत त्याबद्दल
Quality Time – तुम्ही दररोज किती वेळ फोन वापरता?


  • Profile Name – ब्रेकचे नाव उदाहरणार्थ Work Time, Family Time
  • Permitted Apps – ब्रेक सुरु असताना कोणते अॅप सुरु रहावीत हे आपण ठरवू शकतो. या पर्यायात आपण निवडू ती एप्लिकेशन्स ब्रेक सुरु असतानाही चालू राहतील.
  • Android Notifications – फोनवर येणारे नोटिफिकेशन्स आपण ब्रेक सुरु असताना थांबवू शकतो (उदाहरणार्थ – Whats App Message)  नोटिफिकेशन्स थांबवण्यासाठी Blcok Notifications समोरील बटणावर टिचकी द्या. ब्रेक संपल्यावर त्या दरम्यान आलेली नोटिफिकेशन्स आपल्याला एकत्र दिसतील.
  • Early Manual Exit Penalty – जर ब्रेक सुरु असताना आपण तो ब्रेक थांबवलात तर शिक्षा म्हणून काही वेळ फोन वापरता येत नाही तो वेळ इथे निवडा ३० सेकंद, ६० सेकंद किंवा ५ मिनिटं.
  • Phone Calls – ब्रेक सुरु असताना येणारे फोन आपण ब्लॉक करू शकतो. यासाठी Block Calls समोरील बटणावर टिचकी द्या.
  • Allow Calls From – ब्रेक सुरु असतानाही काही महत्वाचे, अतिमहत्वाचे फोन कॉल्स येणार असतील तर ते ब्लॉक करता येत नाहीत यासाठी ज्या व्यक्तींचे फोन ब्लॉक करायचे नाहीत ते इथे निवडा यासाठी TAP TO SELECT पर्यायावर टिचकी द्या.
  • Send Auto-Reply to Caller – वरील पर्यायात जे नंबर निवडलेले नाहीत त्यांचे कॉल्स आले तर ते ब्लॉक केले जातील त्यावेळी त्यांना अॅपद्वारे जर एखादा SMS पाठवायचा असेल तर हा पर्याय निवडा.

८) आता ब्रेकची सर्व व्यवस्था झालेली आहे ती जतन करण्यासाठी स्क्रीन वरील उजव्या कोपर्यात SAVE या पर्यायावर टिचकी द्या.

९) आता ब्रेक आपण ठरवू त्या त्या दिवशी त्या त्या वेळी आपोआप सुरु होईल आणी आपण वर दिलेल्या आदेशांप्रमाणे वागेल. इथे त्यासाठी वार आणी वेळ निवडा आणी पुन्हा एकदा स्क्रीन वरील उजव्या कोपर्यात SAVE या पर्यायावर टिचकी द्या.

१०) आता अॅपच्या स्क्रीन वर दिसत आलेल्या Scheduled Breaks या पर्यायावर टिचकी द्या आणी पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसत असलेल्या खालील उजव्या कोपर्यातील तीन आडव्या रेषांवर टिचकी द्या आणी Settings हा पर्याय निवडा.
Quality Time – तुम्ही दररोज किती वेळ फोन वापरता?
११) इथे ALERT ह्या उपपर्यायावर टिचकी द्या, या उपपर्यायात आपण दिवसासाठी ठराविक मर्यादा निवडू शकतो उदाहरणार्थ फोनचा एकूण वापर, स्क्रीन अनलॉक करण्याची संख्या किंवा ठराविक अॅपचा वापर इत्यादी म्हणजे एखादे अॅप त्या दिवशी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वापरले जात असेल तर लगेच तसा अलर्ट दिसेल.

स्मार्टफोन न वापरण्यासाठी त्याच स्मार्टफोनचा असा आधार घेण्याची वेळ येणे ही शोकांतिका असली तरी लोहा लोहेको काटता है हेही विसरून चालणार नाही. आता रोज फोन वापरताना कालपेक्षा कमी वेळ वापरण्याचा प्रयत्न करा.. काही अडचण आली तर आम्ही आहोतच..

+ यशोधन वाळिंबे


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

QualityTime - आपल्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण आणणारे अप्लिकेशन ! QualityTime - आपल्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण आणणारे अप्लिकेशन ! Reviewed by Salil Chaudhary on 23:29 Rating: 5
Powered by Blogger.