या छोट्याश्या युक्तीने आपला फेसबुक वरील वेळ आणि ईंटरनेट डेटा वाचवा .


फेसबुक नेहमी वापरणार्‍यांच्या (म्हणजे आपल्या सर्वांच्याच) एक गोष्ट एव्हाना लक्षात आली असेल की हल्ली आपल्या फेसबुक टाइमलाईनमध्ये व्हीडीओ दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. फेसबुक पुर्वी फोटो किंवा चित्र असलेल्या पोस्टसना प्राधान्य देत असे. परंतु हल्ली फेसबुकने फोटोंपेक्षा व्हीडीओंना अग्रक्रम दिलेला दिसतो. त्याला कारणही तसेच आहे. कारण सोपे आहे जाहिरातदारांची तशी मागणी आहे. सध्या Video Marketing हा सर्वात महत्त्वाचा प्रकार फेसबुकवर जास्तीत जास्त वापरला जावा या उद्देशाने फेसबुकने टाईमलाईन वरील व्हीडीओंची संख्या वाढविली आहे.

कितीही झाले तरी "फेसबुक" हा एक बिझनेस आहे आणि त्यामुळे फेसबुकने असे काही करण्यात काहीही गैर नाही आहे. परंतु या सगळ्यात फेसबुकच्या वापरकर्त्यांना गृहीत धरण्याची एक छोटीशी चुक मार्क झुकरबर्गने केली. टाईमलाईन मध्ये व्हीडीओ वाढवण्यापर्यंत ठीक होते. पण ते व्हीडीओ आपोआप चालु करुन आपलं लक्ष वेधुन घेण्याची आणि त्यातुन viewer engagement वाढविण्याची

फेसबुकची चाल मला काही आवडली नाही. व्हीडीओ आपोआप सुरु करण्यामुळे एकतर आपला अधिकाधिक वेळ फेसबुकवर जाऊ लागला आणि दुसरं म्हणजे ईंटरनेटचं बिलही वाढु लागलं. त्यातच आपण मोबाईल वर फेसबुक जास्त वापरत असल्याने मोबाईल डेटाचं बिल जास्तच वाढु लागलं.

सुदैवाने व्हीडीओ आपोआप सुरु होऊ नयेत यासाठी एक सेटींग फेसबुकने दिलेली आहे (किंबहुना अशी सेटींग देणे त्यांना भागच आहे !). आपल्या मोबाईल आणि संगणकावर ही सेटींग बदलण्यात केवळ २ मिनीट घालवून आपण आपला पुढचा बराच वेळ आणि ईंटरनेटचं बिल वाचवु शकतो.

डेस्कटॉप / लॅपटॉपवर व्हीडीओ ऑटो-प्ले बंद करण्यासाठी खालील चित्रात दाखविलेल्या क्रमाने सेटींग करा -
Drop down menu > Settings > click Videos >  Auto-Play Videos” and select Off.अँड्रॉईड फोनवर व्हीडीओ ऑटो-प्ले बंद करण्यासाठी खालील चित्रात दाखविलेल्या क्रमाने सेटींग करा
Go to Settings > App Settings > General Settings > set Auto-play to “Wi-fi only” or “Off”

फेसबुक मध्ये ही सेटींग्ज करण्यात काही अडचण आल्यास आम्हाला कमेंटस मध्ये लिहा. आणि हो हा लेख फेसबुकवर शेअर करायला विसरु नका !!!

सलिल चौधरी

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

या छोट्याश्या युक्तीने आपला फेसबुक वरील वेळ आणि ईंटरनेट डेटा वाचवा . या छोट्याश्या युक्तीने आपला फेसबुक वरील वेळ आणि ईंटरनेट डेटा वाचवा . Reviewed by Salil Chaudhary on 01:03 Rating: 5
Powered by Blogger.