TimeTune - क्योंकी वक्त बदलता रहता है..

नमस्कार वाचक मित्रहो, आपण नेहेमीच ऐकतो जो वेळेचा आदर ठेवतो वेळ त्याचा आदर ठेवते. आजच्या लेखाच्या विषयाकडे वळण्यापूर्वी कुठेतरी वाचलेल्या खालील ओळी पहा,
 • एका वर्षाचे महत्व वार्षिक परीक्षेत नापास झालेला विद्यार्थीचं योग्य प्रकारे जाणतो..
 • एका महिन्याचे महत्व आठव्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणारी आईचं योग्य प्रकारे जाणते..
 • एका आठवड्याचे महत्व पाक्षिकाचा संपादकचं योग्य प्रकारे जाणतो..
 • एका दिवसाचे महत्व रोजंदारीवरचा मजुरचं योग्य प्रकारे जाणतो..
 • एका तासाचे महत्व वाट पाहणारा प्रेमीच योग्य प्रकारे जाणतो..
 • एका मिनिटाचे महत्व ज्याची ट्रेन सुटलीय असा व्यक्तीचं योग्य प्रकारे जाणतो..
 • एका सेकंदाचे महत्व ज्याचा अपघात टळलाय असा व्यक्तीचं योग्य प्रकारे जाणतो..
 • आणी एका मिली सेकंदाचे महत्व ऑलिम्पिक्स मधील रौप्य पदक विजेताचं योग्य प्रकारे जाणतो..

TimeTune - Android time mamanegement productivity app

कदाचित वेळेचा महिमा ह्याहून चांगल्या प्रकारे सांगता आला नसता..  आज आपण एका अशा अॅपबद्दल माहिती घेणार आहोत ज्याचा वापर करून आपल्या वेळेचे सुयोग्य नियोजन करू शकतो. हे अॅप आपण ठरवून दिल्याप्रमाणे आपल्याला वेळोवेळी सूचना देईल आणी आपल्या वेळापत्रकाचे स्मरण करून देईल..

१) गुगल प्ले स्टोर मधून TimeTune हे अॅप प्रस्थापित करून घ्या. 

२) अॅप सुरु केल्यावर ह्या अॅपची वैशिष्ठे दिसतील, स्क्रीन उजवीकडून डावीकडे सरकवा आणी शेवटी START या पर्यायावर टिचकी द्या.
TimeTune - Android time mamanegement productivity app
३) अॅपचे मुखपृष्ठ आणी इतर पर्याय दिसतील, एक नुकतेच प्रस्थापित केले असल्यामुळे त्यात आपले वेळापत्रक फीड करावे लागेल, यासाठी Routines या पहिल्याच पर्यायावर टिचकी द्या.
TimeTune - Android time mamanegement productivity app
४) इथे आधीपासून एक नमुना उपलब्ध आहे त्यावर टिचकी द्या, अॅपमध्ये एकापेक्षा अधिक वेळापत्रकं जतन करून ठेवता येतात.

५) ज्या दिवशी अॅप प्रस्थापित करत आहात तो दिवस दिसेल पण अॅप नुकतेच प्रस्थापित केले असल्यामुळे त्यात अधिक काहीही नसेल.

६) नवीन क्रिया जोडण्यासाठी स्क्रीनच्या वरील उजव्या कोपर्यात दिसत असलेल्या + (अधिक) च्या चिन्हावर टिचकी द्या.
TimeTune - Android time mamanegement productivity app
येथे खालील पर्याय दिसतील
 • Start – एखादी क्रिया कधी सुरु करणार आहात हे ठरवा
 • End – एखादी क्रिया कधी पूर्ण करणार आहात हे ठरवा
 • Main Tag – कोणती क्रिया करणार आहात ते इथे ठरवता येते, यासाठी Main Tag च्या समोर असलेल्या क्रियेवर टिचकी द्या आणी क्रियेचा एखादा Tag निवडा, उदाहरणार्थ Reading, Sleeping इत्यादी. जर यादीत तुमची क्रिया नसेल तर NEW TAG पर्यायावर टिचकी देऊन नवीन क्रिया यादीत जोडता येते.
 • Additional tag – एखाद्या क्रीयेखाली उप क्रिया जोडता येते उदाहरणार्थ – अभ्यास – विषय, वाचन – पुस्तक इत्यादी
 • Comment - एखादी क्रिया का जतन केली हे आपल्या लक्षात राहावे म्हणून हा पर्याय आहे.
 • Add Notification – एखाद्या क्रियेसाठी गजर किंवा रिमाईंडर म्हणून हा पर्याय आहे.
आता स्क्रीन वरील उजव्या कोपर्यातील बरोबरच्या टिकेवर टिचकी द्या.

७) अशाच पद्धतीने संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक जतन करून ठेवू शकता. एका दिवसाचे वेळापत्रक दुसऱ्या दिवशी किंवा बाकीच्या सर्व दिवशी कॉपी करण्यासाठी स्क्रीन वरील उजव्या कोपऱ्यातील तीन उभी टिंब दिसत आहेत टिचकी द्या आणी Clone day to... हा पर्याय निवडा.

८) आता कोणकोणत्या दिवशी हेच वेळापत्रक हवे आहे ते दिवस निवडा आणी OK वर टिचकी द्या. त्या दिवशीचे वेळापत्रक इतर निवडलेल्या दिवशी कॉपी होईल.

९) आता स्क्रीनवर दिसत असलेल्या डाव्या कोपर्यातील बाणावर टिचकी द्या आणी पुन्हा त्याच ठिकाणी दिसत असेल्या रेषांवर देखील टिचकी द्या. इथे
TimeTune - Android time mamanegement productivity app
 • Routines पर्यायामध्ये आपली वेळापत्रकं दिसतील आणी नियंत्रित करता येतील.
 • Statistics पर्यायामध्ये आपल्या वेळापत्रकाचा सारांश दिसेल नियंत्रित करता येईल..
 • Tags या पर्यायात आपल्या क्रिया म्हणजेच कामं दिसतील नियंत्रित करता येतील..
 • Settings या पर्यायात Interface (Themes), Backup आणी नोटिफिकेशन्स नियंत्रित करता येतील.
हे अॅप विनामुल्य आणी सशुल्क अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे (विनामुल्य आवृत्तीत जाहिराती दिसतात). आपण मराठीतून देखील आपले वेळापत्रक जतन करून ठेऊ शकतो. आता वेळ न दवडता हे अॅप वापरा आणी काही अडल तर इथे विचारा.. क्योंकी वक्त बदलता रहता है..

+ यशोधन वाळिंबे


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

TimeTune - क्योंकी वक्त बदलता रहता है.. TimeTune - क्योंकी वक्त बदलता रहता है.. Reviewed by Salil Chaudhary on 23:20 Rating: 5
Powered by Blogger.