गुगलला आपल्याकडून मराठी शिकायचीयं, चला शिकवूयात

एका भाषेतून दुसऱ्या भाषेत मजकूर भाषांतरित करताना बहुतेक जण गुगलची मदत घेतात. गुगलचे अद्ययावत तंत्रज्ञान आणी उपलब्धता यामुळे कोणत्याही भाषेतील मजकूर कोणत्याही भाषेत सहज भाषांतरित केला जाऊ शकतो, पण मराठी किंवा इतर भारतीय भाषांच्या भाषांतराबद्दल बोलायचे झाले तर ‘भीषण..!!’ ह्या शब्दाशिवाय दुसरा शब्दच सुचत नाही. जरी गुगलचे तंत्रज्ञान अद्ययावत असले तरी शब्द किंवा छोट्या छोट्या वाक्यांचा अपवाद वगळता भाषिक अज्ञानामुळे भाषांतर अत्यंत सुमार दर्जाचे होते. भाषांतराचा दर्जा सुधारावा यासाठी गुगलने आपल्याला म्हणजेच स्थानिक भाषा बोलणाऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे आणी भाषांतरासाठी समूह तयार केला आहे. आपले छोटेसे योगदान मराठीला म्हणजे पुन्हा आपल्यालाच प्रचंड फायदेशीर ठरू शकते, यासाठीच गुगलला आपली मराठी भाषा शिकवायला हवी.

गुगलला आपल्याकडून मराठी शिकायचीयं, चला शिकवूयात

गुगल व्यावसाईक कंपनी आहे त्यामुळे आपल्या सहभागाने गुगलचा फायदा होणार नाही का?

तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल (जो वर्षानुवर्ष गुगलच्या अगणिक सेवा विनामुल्य वापरणाऱ्यांना पडणे अयोग्य आहे) तर.. आपल्या योगदानामुळे फक्त गुगलचा नाही तर सर्वांचाच फायदा आहे. पहा कसा तो..
  • इंग्रजी न येणारे मराठी भाषिक – समजा भविष्यात ग्रामीण भागातील एखाद्या विद्यार्थ्याला आंतरजालावर एखाद्या विषयाबद्दल माहिती हवी असेल आणी ती मराठी भाषेत उपलब्ध नसेल आणी जर इंग्रजीत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल तर तो विद्यार्थी एका चुटकीसरशी कोणतेही इंग्रजी भाषेतील संकेतस्थळ मराठीत पाहू शकतो. कारण गुगल संपूर्ण संकेतस्थळ एका टिचकीसरशी भाषांतरित करू शकते जी सुविधा आताही उपलब्ध आहे पण भाषांतराचा दर्जा अत्यंत सुमार आहे.
  • अमराठी भाषिक – जगभरातील अमराठी भाषिक मराठीतील कोणताही मजकूर त्यांच्या भाषेत किंवा इंग्रजीत वाचू शकतील यामुळे मराठीतील उपयुक्त मजकूर जागतिक स्तरावर अनेक भाषांमध्ये पोहोचेल.
  • गुगल – निश्चितच यात गुगलचाही फायदा आहे पण दुसऱ्या बाजूला गुगल आपल्याला त्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विनामुल्य वापरायला देत आहे आणी आजवरचा अनुभव पाहता गुगल ही सुविधा आजीवन विनामूल्यच ठेवेल.
  • प्रवासी – एखादा अमराठी प्रवासी महाराष्ट्रात आला आणी त्याला मराठीत असलेल्या दुकानाच्या पाट्या / सूचना फलक / इतर माहिती वाचायची असेल तर तो त्याचा स्मार्टफोन वापरून काही क्षणांत त्याच्या भाषेत भाषांतरित करू शकतो.
मातृभाषेतून एखादी गोष्ट लवकर समजते हे सिद्ध झाले आहे. नवीन तंत्रज्ञान आणी तांत्रिक मर्यादा यामुळे इतर भाषांच्या तुलनेत आतापर्यंत हव्या त्या प्रमाणात मराठी भाषेत मजकूर निर्माण झाला नाही पण आपल्याला पुढील पिढ्यांना ते कारण देता येणार नाही म्हणूनच आंतरजालावर मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी आपण सहाय्य करणे क्रमप्राप्त ठरते.

गुगलमध्ये भाषांतरासाठी योगदान कसे द्यायचे?

  • Get Started वर टिचकी द्या आणी तुम्हाला ज्या भाषा अवगत आहेत किंवा ज्या भाषांसाठी भाषांतर करायचे आहे त्या भाषा निवडा, इथे मराठीची निवड करा आणी Save वर टिचकी द्या. इंग्रजी ही मूळ भाषा आहे त्या भाषेतून भाषांतर करणे अपेक्षित आहे.

गुगलला आपल्याकडून मराठी शिकायचीयं, चला शिकवूयात

गुगलला आपल्याकडून मराठी शिकायचीयं, चला शिकवूयात
  • वेळोवेळी गुगलकडून ई-मेल हवे असल्यास तसे निवडा आणी Save (Continue) वर टिचकी द्या.
  • आता तुम्ही मुखपृष्ठावर याल. भाषांतरासाठी इथे दोन पद्धतीने मदत करता येते.
एक म्हणजे स्वतः भाषांतर करणे आणी दुसरे म्हणजे इतरांनी केलेले भाषांतर तपासणे.

स्वतः भाषांतर करण्यासाठी TRANSLATE वर टिचकी द्या – तीन दोप्या पायऱ्यांमध्ये आपल्याला भाषांतर करता येते.

  • पहा – दिलेला इंग्रजी शब्द किंवा वाक्य पहा
  • भाषांतर करा – त्याचे भाषांतर करून टाईप करा
  • भाषांतर केल्यावर SUBMIT वर टिचकी द्या आणी भाषांतर जमत नसल्यास SKIP वर टिचकी द्या.

भाषांतर तपासण्यासाठी VALIDATE वर टिचकी द्या. 

तुम्हाला एक इंग्रजी शब्द किंवा वाक्य दिसेल. त्याखाली ४ - ५ मराठी भाषांतरे दिसतील त्यातली चुकीची कोणती आणी बरोबर कोणती हे निवडा.
भाषांतर बरोबर असेल तर बरोबरच्या खुणेपुढे टिचकी द्या आणी भाषांतर चुकीचे असेल तर फुलीच्या खुणेपुढे टिचकी द्या. ठरवता येत नसल्यास कुठेही टिचकी देऊ नका.
शेवटी SUBMIT वर टिचकी द्या किंवा जर एकही भाषांतर ठरवता येत नसेल तर SKIP वर टिचकी द्या.

भाषांतर आणी तपासणीचे काम कसे कराल? 

इथे दिलेले चित्र पहा यावरून तुम्हाला कल्पना येईल.

गुगलला आपल्याकडून मराठी शिकायचीयं, चला शिकवूयात

महत्वाचे :

१)    मराठीत भाषांतर करताना किंवा तपासताना भाषांतर शक्य तितके वैश्विक असेल असे पहा म्हणजेच जर

इंग्रजीतील जर is going चे भाषांतर करायचे असेल तर 

पुल्लिंगा साठी भाषांतर “जातो आहे” असे होईल आणी स्त्रिलिंगा साठी “जाते आहे” असे होईल पण अशा वेळी शक्यतो “जात आहेत” असे भाषांतरीत करावे जे दोन्हींसाठी वापरता येईल. इतर शब्द किंवा वाक्य भाषांतरीत करताना तुम्हाला जशी गुगल मध्ये पाहायला आवडतील तशा पद्धतीने करावीत.

२)    शब्दशः भाषांतर अपेक्षित नाही तर अर्थाचे भाषांतर अपेक्षित आहे. आपण मराठीतील त्याच अर्थाची समर्पक म्हणी, वाक्य भाषांतरात वापरू शकतो.

दिवसेंदिवस यात सुधारणा होत असली तरी अजूनही यात बरेच योगदान आवश्यक आहे. तुम्ही या आधी प्रसिद्ध झालेला "चाणाक्ष मार्कची चतुर खेळी" हा लेख वाचला असेल आता तोच लेख गुगलच्या सहाय्याने इंग्रजीत वाचून पहा काही कळतंय का.. - http://bit.do/tsunetbhet

किंवा FirstPost वर प्रसिध्द झालेली बातमी गुगलच्या सहाय्याने मराठीत वाचून पहा काही कळतंय का.. - 
http://bit.do/firstpoststartup

सध्या हे वाचून एकंदर मजकूर कशाबद्दल आहे एवढेच कळते पण आपल्या सर्वांच्या सक्रीय सहकार्याने यात सुधारणा होईल. चला तर मग गुगलला मराठी शिकवूयात. काही अडचण आली तर इथे मांडा.

+ यशोधन वाळिंबे

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

गुगलला आपल्याकडून मराठी शिकायचीयं, चला शिकवूयात गुगलला आपल्याकडून मराठी शिकायचीयं, चला शिकवूयात Reviewed by Salil Chaudhary on 21:43 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.