विना गुंतवणूक शेयर मार्केटबद्दल शिका !

नमस्कार वाचकहो, आज आपण शेयर मार्केट बद्दल पाहणार आहोत (थांबा थांबा, शेयर मार्केटचे नाव पाहून दुसरीकडे वळू नका),
विना गुंतवणूक शेयर मार्केट शिका

आपण आज शेयर मार्केटमध्ये एकही पैसा गुंतवणूक न करता गुंतवणुकीचा अनुभव मिळवायचा ते पाहुयात. तत्पूर्वी इथे दिलेले दोन व्हिडियो दिलेल्या क्रमाने पहा (नव्हे पहाच ),

१) शेयर मार्केटबद्दल तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या काय भावना आहेत?२)  दुसरी बाजू..


मनीकंट्रोल.कॉम (Moneycontrol.com) हे संकेतस्थळ तुम्ही कदाचित ऐकून असाल, ह्या संकेतस्थळाने एक स्टॉक मार्केट गेम तयार केला आहे जो आपल्याला गुंतवणुकीचा अनुभव देतो.

मनीभाई असे या गेमचे नाव आहे, हा गेम संपूर्णपणे इंटरनेटवर खेळला जातो. गेम खेळण्यासाठी नोंदणी केल्यावर आपल्याला १ करोड रुपये (गेम मधे) दिले जातात आणी त्यातून आपण आपल्याला हवे त्या शेयर्स मध्ये गुंतवणूक करू शकतो. आजपर्यंत जवळपास १,४०,००० लोकांनी नोंदणी केली आहे आणी त्यापैकी बहुतांश लोक हा गेम खेळतात. सर्व शेयर्सच्या किमती ह्या क्षणाक्षणाला अपडेट होत असतात म्हणजेच शेयर विकत घेताना त्या शेयरची खऱ्या शेयर मार्केटमध्ये जी किंमत असेल तीच किंमत गेम मध्ये त्या शेयरची असते.

उदाहरणार्थ जर – Dish TV चा शेयर मार्केटमध्ये १०२ रुपयांना असेल तर गेम मध्ये देखील तो शेयर १०२ रुपयांना मिळेल आणी मार्केटमध्ये त्याची किंमत जशी कमी-जास्त होईल तशी ते गेम मध्ये देखील लगेच होईल.

आणी हा गेम जरी २४ तास उपलब्ध असला तरी जेव्हा शेयर मार्केट सुरु असेल तेव्हाच तो कार्यरत असतो उदाहरणार्थ सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० आणी शनिवार/रविवार/सुट्ट्या वगळता सगळ्या दिवशी.
१) सर्वप्रथम Moneybhai.com या संकेतस्थळावर भेट द्या किंवा इथे टिचकी द्या.

२) आता Register Now या पर्यायावर टिचकी द्या.


३) दिसत असलेला फॉर्ममध्ये तुमची माहिती भरा, मोबाईल नंबर नाही दिला तरी चालेल पण ई-मेल पत्ता आवश्यक आहे. पासवर्ड कमीत कमी ८ अक्षरी असला पाहिजे आणी त्यात एक कॅपिटल शब्द, एक नंबर आणी एक चिन्ह असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ – Net_bhe8
४) माहिती भरून झाल्यावर Continue वर टिचकी द्या. इथे Industry आणी Annual Income वगळता सर्व माहिती देणे आवश्यक आहे. माहिती भरून झाल्यावर Create Account वर टिचकी द्या.


५) आता तुम्ही जो ई-मेल पत्ता दिला आहे त्यामध्ये प्रवेश करा आणी नवीन आलेल्या ई-मेल मध्ये दिसत असलेल्या दुव्यावर टिचकी देऊन खाते अॅक्टीव्हेट करा.६) आता पुन्हा Moneybhai.com या संकेतस्थळावर या, आणी तुमचे युझरनेम आणी पासवर्ड देऊन प्रवेश करा आणी एखादे निकनेम (टोपणनाव) निवडा आहे Continue वर टिचकी द्या.


७) आता पहिल्या पोर्टफोलिओला एखादे नाव द्या (उदाहरणार्थ – Learning Portfolio) किंवा कोणतेही तुम्हाला आवडेल ते. Done टिचकी द्या.८) आता वर जी आडवी निळी पट्टी दिसत आहे त्यामध्ये My Investments वर माउस न्या त्याखाली उप-पर्याय दिसतील त्यातील MY SPACE या उप-पर्यायात आपल्याला आपण तयार केलेला पोर्टफोलिओ दिसेल (काही वेळा पोर्टफोलिओ लगेच दिसत नाही तेव्हा थोडा वेळ थांबा नाहीतर वेगळ्या नावाने दुसरा पोर्टफोलिओ तयार करा). जास्तीत जास्त १० पोर्टफोलिओ तयार करता येतात आणी प्रत्येक पोर्टफोलिओ मध्ये १ करोड रुपये वापरायला मिळतात.


MY SPACE पर्यायाखाली तुमचे सर्व पोर्टफ़ोलिओज दिसतील, जास्तीत जास्त १० पोर्टफ़ोलिओ तयार करता येतात.९) शेयर्स विकत घेण्यासाठी Transact या पर्यायावर माउस न्या (Don't Click) आणी Stock या उप-पर्यायावर टिचकी द्या  शेयर मार्केट बद्दल, उजव्या बाजूला दिसत असलेल्या LEARN & INVEST पर्यायाखाली असलेल्या उप-पर्यायांमध्ये दुवे दिसतील तिथे तज्ञांची मते, त्यांचे सल्ले, स्टॉक टिप्स इत्यादी वाचता येईल.


शेयर विकत घेण्यासाठी  खालील चित्रात दिले आहे तसे अनुकरण करा.  इथे मी Dish Tv या शेयर साठी १०० शेयर्सची ऑर्डर नोंदवत आहे, तुम्ही कोणतीही ऑर्डर नोंदवू शकता. अधिक विस्तृत माहिती त्याच पानावर खाली मिळेल.सध्या हा गेम BETA म्हणजेच बाल्यावस्थेत आहे त्यामुळे Mutual Funds, Bonds सारखे पर्याय दिसत असले तरी ते सुरु नाहीत, हळूहळू तेही सुरु होतील अशी अपेक्षा धरुयात. त्यामुळे सध्या फक्त CASH, INTRADAY, FIXED DEPOSITS हे तीन पर्याय व्यवस्थित सुरु आहेत.

तंत्रज्ञानाची माहिती घेतली आता शेयर मार्केटचे काय?
एक सर्वोत्तम पर्याय म्हणजे Trial & Error (करा, चुका आणी शिका) जो अर्थातच बहुतेकांना खऱ्या शेयर मार्केट मध्ये पैसे गुंतवून शक्य नसतो त्यामुळे तो पर्याय ह्या गेम मध्ये वापरता येईल. १ करोड रुपयांचा सगळा जरी तोटा झाला तरी Balance कोणत्याही क्षणी Reset करून पुन्हा १ करोड वर आणता येतो. आणी गुंतवलेली रक्कम मार्केटच्या हालचालीनुसार कमी जास्त होत असते.

पंकज जैन हे शेयर ब्रोकर अनेक वर्षांपासून शेयर मार्केट विषयावर व्याख्याने देत आहेत / कार्यशाळा घेत आहेत. त्यांनी Youtube वर बरीच माहिती हिंदी भाषेतून विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे, १६ हजार लोक त्यांचे Youtube वर अनुयायी आहेत (मला स्वतःला त्यांच्याकडून Youtube द्वारे बरंच शिकायला मिळाले)..

तुम्ही देखील त्यांच्या Youtube Channel ला भेट देऊ शकता त्यासाठी इथे टिचकी द्या.

गुंतवणूक करण्यापूर्वी.. वॉरन बफेट यांचे गुंतवणुकी संदर्भातील दोन नियम
१) आपले भांडवल गमावू नका.
२) नियम क्रमांक १ कधीही विसरू नका.

गुगल वर शेयर मार्केट बाबत हवी तेवढी माहिती मिळू शकते. काही अडचण उद्भवली तर इथे मांडा.. देशात उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार होत आहे हे ओळखून अनेक विदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित झाले आहेत, तुम्ही देखील अशी छोटी पाऊलं उचलून गुंतवणुकीचे ज्ञान मिळवू शकता. Happy Investing..!!


+ यशोधन वाळिंबे

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

विना गुंतवणूक शेयर मार्केटबद्दल शिका ! विना गुंतवणूक शेयर मार्केटबद्दल शिका ! Reviewed by Salil Chaudhary on 06:13 Rating: 5
Powered by Blogger.