व्याख्यान - "मातृभाषेतून तंत्रज्ञान शिक्षण"

मुरबाड येथील सुयश महाविद्यालयाने मातृभाषा दिना निमित्त "मातृभाषेतून तंत्रज्ञान शिक्षण" या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. 

कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन जगाबद्दल बरेच प्रश्न होते. 
 • स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय कसा सुरु करायचा ? 
 • ब्लॉगींग मधून पैसे कसे कमवायचे ?
 • वेबसाईट कशी बनवायची? 
 • घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? 
 • फेसबुक चा वापर पैसे कमावण्यासाठी कसा करावा ?
 • डीजीटल ईंडीया म्हणजे काय उपक्रम आहे ? 
 • डीजीटल मार्केटींग म्हणजे काय ?
 • युट्युब चॅनेल कसा सुरु करायचा ? 
 • अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या वेबसाईट्सवर विक्री व्यवसाय कसा सुरु करायचा ?
 • आपल्या छंदाचं रुपांतर व्यवसायात कसं करायचं ?
 •  हे सर्व आपल्या मातृभाषेत करता येईल का ?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मुलांनी माझ्याकडून मिळविली. दोन तासांसाठी ठरलेला कार्यक्रम ३ तासांहुनही पुढे चालला.


तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात , मुख्यत्वे ऑनलाइन जगात आपल्या मातृभाषेतही करण्यासारखे खूप काही आहे आणि आपणही ते करू शकतो हे विद्यार्थ्यांना कळल्या नंतर त्यांच्या डोळ्यात अवतरलेली एक वेगळीच चमक दिवस सार्थकी लावून गेली. 

सलिल चौधरी 
salil@netbhet.com


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


व्याख्यान - "मातृभाषेतून तंत्रज्ञान शिक्षण" व्याख्यान - "मातृभाषेतून तंत्रज्ञान शिक्षण" Reviewed by Salil Chaudhary on 10:16 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.