अँड्रॉईड फोन मधील अ‍ॅप्सचे नोटीफिकेशन कसे बंद करावे ?

मित्रहो, आपण विविध अ‍ॅप्स आपल्या स्मार्टफोन मध्ये ईंस्टॉल करत असतो आणि वेळोवेळी हे अ‍ॅप्स आपल्याला काही माहिती पुरवत असतात , Notifications पुरवत असतात. नविन कॉल्स, एसएमएस, व्हॉट्स अ‍ॅप मेसेजेस, ईमेल्स, फेसबुक अपडेट्स ईत्यादींची माहिती सतत आपल्या स्क्रीनवर येतच असते.

व्हॉट्स अ‍ॅप चे नोटीफीकेशन्स तर दिवसभर हात धुवून मागेच लागलेले असतात.असे हे नोटीफीकेशन्स काही वेळानंतर आपल्याला त्रास देउ लागतात. म्हणजेच खुप जास्त प्रमाणात आणि वारंवार नोटीफीकेशन्स येत राहतात त्यामुळे आपला पुर्ण वेळ मोबाईल पाहण्यात जातो आणि एकाग्रतेने कोणतंच काम नीट करता येत नाही.

 यापैकी काही नोटीफीकेशन्स आवश्यक असतात आणि काही फारसे गरजेचे नसतात. तर असे आपल्याला आवश्यक नसलेले नोटीफीकेशन्स अँड्रॉईड फोनमध्ये बंद कसे करता येतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी हा एक व्हीडीओ बनविला आहे. या व्हीडीओ मध्ये नोटीफीकेशन्स बंद करण्यासंबंधी STEP-BY-STEP माहिती दिली आहे.असे अनेक उपयुक्त व्हीडीओ मी "नेटभेट युट्युब चॅनेल" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

अँड्रॉईड फोन मधील अ‍ॅप्सचे नोटीफिकेशन कसे बंद करावे ? अँड्रॉईड फोन मधील अ‍ॅप्सचे नोटीफिकेशन कसे बंद करावे ? Reviewed by Salil Chaudhary on 07:51 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.