आपल्या अँड्रॉईड फोनचा वाय-फाय हॉटस्पॉट म्हणून उपयोग करा. 

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या अँड्रॉईड मोबाईल फोनला आपण "वाय-फाय मोबाईल हॉट-स्पॉट" म्हणून कसे वापरु शकतो.


मोबाईल हॉट-स्पॉट (Mobile hotspot) म्हणजे काय ?

मोबाईल हॉट-स्पॉट काय आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला टेथरींग (Tethering) हा आणखी एक टेक्निकल शब्द जाणून घ्यावा लागेल.
जेव्हा आपल्या मोबाईल फोन मधील इंटरनेट डेटा कनेक्शन आपण इतर कंप्युटर्,मोबाईल, टॅबलेट इत्यादी उपकरणांबरोबर वाटून घेतो त्यास टेथरींग असे म्हणतात.

 टेथरींग तीन प्रकारे करता येते.
 १. युएसबी केबल
 २. ब्ल्युटुथ
 ३. वाय-फाय

 यापैकी तीसरा म्हणजेच वाय-फाय चा वापर करुन जेव्हा टेथरींग केली जाते त्यास "मोबाईल हॉटस्पॉट" असे म्हणतात.

मोबाईल हॉटस्पॉट बनविण्याची आवश्यकता का भासते ? 

१. समजा तुमच्या फोनवर इंटरनेट आहे, परंतु तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींकडे इंटरनेट नसेल तर तुम्ही "मोबाईल हॉट-स्पॉट" बनवून कुटुंबातील सर्व व्यक्तींना तुमचं इंटरनेट कनेक्शन वापरायला देउ शकता.

 २. किंवा तुम्ही एखाद्या मीटींग मध्ये किंवा प्रेझेंटेशनमध्ये आहात आणि आपल्याला लॅपटॉपवर इंटरनेट जोडण्याची आवश्यकता असेल तर लगेचच मोबाईल हॉट-स्पॉट बनवून तुम्ही लॅपटॉप इंटरनेटला जोडू शकता.

३. जर तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागत असेल तर तुम्ही आपल्या स्मार्टफोनला "मोबाईल हॉट-स्पॉट" बनवून कधीही आणि कुठेही इंटरनेट जोडू शकता.

तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनला "मोबाईल वाय-फाय हॉटस्पॉट" कसे बनवाल ? 


मित्रांनो, अँड्रॉईड स्मार्टफोनला "मोबाईल वाय-फाय हॉटस्पॉट" कसे बनवायचे हे समजावून सांगणारा एक छोटासा व्हीडीओ मी बनविला आहे. तो पाहिल्यानंतर तुम्हालाही आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनला "मोबाईल वाय-फाय हॉटस्पॉट" मध्ये रुपांतरीत करता येईल.असे अनेक उपयुक्त व्हीडीओ मी "नेटभेट युट्युब चॅनेल" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद ! 


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

आपल्या अँड्रॉईड फोनचा वाय-फाय हॉटस्पॉट म्हणून उपयोग करा.  आपल्या अँड्रॉईड फोनचा वाय-फाय हॉटस्पॉट म्हणून उपयोग करा.  Reviewed by Salil Chaudhary on 09:52 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.