“जग जिंकायचंय ?” मग सुरुवात “का” या प्रश्नाने करा !

"आपण जे काही काम करतोय ते का करत आहोत ?" याचं उत्तर आपल्याला माहित आहे असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. पण खरंच आपल्याला नेमकं माहित असतं का ?

"मी पैसे कमावण्यासाठी काम करतो" हे जर तुमचं उत्तर असेल तर मित्रांनो ते उत्तर पुर्ण बरोबर नाही. कारण जर पैसे कमावणं हाच उद्देश असता तर तुम्ही  आता जे काम करत आहात त्याव्यतीरीक्त अधिक पैसे मिळवून देणारे एखादे काम केलं असतं. नोकरी करणार्‍या व्यक्तीने जास्त पैसे कमावण्यासाठी बिझनेस सुरु केला असता. प्रत्येक अकाउंटंट जास्त पैसे मिळविण्यासाठी सीए झाला असता. प्रत्येक वाणी/दुकानदार मोठ्या मॉलचा मालक झाला असता किंवा प्रत्येक सेल्समॅन त्याच्या कंपनीचा सेल्स हेड झाला असता.


परंतु मित्रांनो, तसं नाहीये. आणि म्हणूनच "आपण जे काही काम करत आहोत ते का करत आहोत" या प्रश्नाचं खरं उत्तर प्रत्येकाने आपापलं शोधलं पाहिजे. आपल्या कामाचं , आपल्या जीवनाचं, आपल्या आयुष्यातील प्रत्येक कृतीचं अंतीम उद्दीष्ट काय आहे जे जाणून घेतलं पाहिजे.

सायमन सिनेक (Simon Sinek) या मॅनेजमेंट गुरुने " स्टार्ट विथ व्हाय " (Start With Why /"का"ने सुरुवात करा !) या पुस्तकामध्ये आपल्या कामामधील अंतीम उद्दीष्ट जाणून घेणे का म्हत्व्हाचे आहे याचे सखोल विवेचन केले आहे.

जीवनात यशस्वी होण्याची, नोकरी किंवा व्यव्सायात यश मिळविण्याची प्रचंड इच्छा ज्या व्यक्तींना आहे अशा सर्वांसाठी "स्टार्ट विथ व्हाय?" हे पुस्तक खुप मोलाचे आहे.

जगातील केवळ काही मोजक्याच कंपन्या आणि मोजकेच लोक अतिशय यशस्वी का आहेत आणि ते एकदाच नव्हे तर आयुष्यात अनेक वेळा यशस्वी का होऊ शकले याचे सोपे आणि सुंदर विवेचन सायमन सिनेक यांच्या "स्टार्ट विथ व्हाय ? ("का"ने सुरुवात करा !) या पुस्तकात वाचायला मिळते.

मित्रांनो, तुमचा वेळ वाचविण्यासाठी या पुस्तकाचा सारांश समजावून देणारा एक छान मराठी व्हीडीओ मी बनवला आहे. केवळ ४ मिनिटांचा हा व्हीडीओ तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेला मंत्र देऊ शकेल. तेव्हा हा व्हीडीओ जरुर पहा. व्हीडीओ पाहून झाल्यानंतर तुमचा प्रतीसाद नक्की कळवा तसेच तुमच्या प्रियजनांबरोबर हा व्हीडीओ शेअर करण्यास विसरु नका !
धन्यवाद ! यशस्वी भव !असे अनेक उपयुक्त व्हीडीओ आम्ही "नेटभेट युट्युब चॅनेल" मध्ये प्रकाशित केले आहेत. या सर्व व्हीडीओंची माहिती मिळविण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला जरुर स्बस्क्राईब करा. धन्यवाद !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

“जग जिंकायचंय ?” मग सुरुवात “का” या प्रश्नाने करा ! “जग जिंकायचंय ?” मग सुरुवात “का” या प्रश्नाने करा ! Reviewed by Salil Chaudhary on 02:55 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.