22 May 2016 - युट्युबच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे कमावण्याची कला ! - (Free Youtube Webinar in Marathi)

नमस्कार मित्रहो,
नेटभेट तर्फे आम्ही घेउन येत आहोत एक पुर्णपणे मोफत मराठी वेबिनार (ऑनलाईन सेमीनार). या सेमीनार मध्ये मी सलिल सुधाकर चौधरी तुम्हाला सांगणार आहे "युट्युबच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?"
युट्युबने केव्हाच टीव्हीची जागा घेतली आहे. गुगल पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे "सर्च ईंजीन" असलेल्या या साईटवर लोक विविध विषयांवरील व्हीडीओ शोधत असतात आणि तासंतास ते व्हीडीओ पाहत असतात. तुम्हीही कदाचित हे करत असाल.
परंतु मित्रांनो, युट्युब मध्ये व्हीडीओ पाहण्यात केवळ वेळ न घालवता तुम्ही स्वतः व्हीडीओ बनवून त्यापासून पैसे कमावू शकता. आपली आवड जोपासत पैसे कमावण्याचा हा राजमार्ग आहे. आणि या राजमार्गावरून कसे चालायचे हे मी तुम्हाला या सेमीनार मध्ये सांगणार आहे.

# हा वेबिनार पुर्णपणे मोफत आहे. आणि # केवळ २५ जागा उपलब्ध आहेत.

#(पुढील आठवड्यात होणार्‍या या वेबिनारची निश्चीत तारिख आणि वेळ (२ तास) तुम्हाला ईमेलद्वारे कळविली जाईल.)

या सेमीनार मध्ये काय शिकाल ?


 • युट्युब बद्दल माहिती
 • युट्युब चॅनेल म्हणजे काय ? स्वतःचा युट्युब चॅनेल कसा बनवायचा ?
 • कोणत्या प्रकारचे व्हीडीओ तुम्ही बनवू शकता ?
 • व्हीडीओ मधून पैसे कसे कमवायचे ?
 • युट्युबचा वापर तुमचा व्यवसाय/सेल्स वाढविण्यासाठी कसा करायचा ?
 • युट्युब चॅनेलचे प्रेक्षकसंख्या कशी वाढवायची ?
 • युट्युब साठी व्हीडीओ बनवत असताना कोणती काळजी घ्यावी (Do's and Don'ts)
 • युट्युब बद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरे.

हा ऑनलाईन सेमीनार कुणासाठी आहे. -


 • ज्यांना आपली कला / माहिती / ज्ञान व्हीडीओच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवायचे आहे आणि त्याचे पैसे देखिल कमवायचे असतील अशा सर्वांसाठी
 • ज्यांना आपल्या व्यवसायासाठी नविन ग्राहक मिळवायचे आहेत.
 • ज्यांना नविन काहीतरी निर्माण करण्याची/ घडवण्याची मनापासून इच्छा आहे.
मित्रांनो तुम्हाला या वेबिनार मध्ये सहभागी व्हायला आवडेल का? आणि जर तुमचं उत्तर हो असेल तर २५ जणांमध्ये तुमची जागा बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या दोन गोष्टी करायच्या आहेत.

१. या फॉर्ममध्ये तुमचे नाव, ईमेल पत्ता देऊन रजिस्टर करा तसेच युट्युबसंबंधी तुम्हाला काही प्रश्न असतील ते लिहा. (http://goo.gl/forms/C4tISrDBVB) २. येथे क्लिक करून नेटभेटच्या युट्युब चॅनेल ला Subscribe करा.

धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी
(admin@netbhet.com)
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

22 May 2016 - युट्युबच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे कमावण्याची कला ! - (Free Youtube Webinar in Marathi) 22 May 2016 - युट्युबच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे कमावण्याची कला ! - (Free Youtube Webinar in Marathi) Reviewed by Salil Chaudhary on 10:41 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.