निसर्गातील बिझनेस शिक्षण !


अमेरिकेतील लुईझीआना (Louisiana) हा भाग सगळ्यात जास्त मगरींची संख्या असणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे मगरींवर संशोधन करणाऱ्या संशोधकांना असे लक्षात आले की, येथील मगरींनी आपल्या तोंडावर बारीक काठ्या ठेवून तासनतास पाण्यात स्तब्ध राहण्याची कला विकसीत केली आहे. 

घरट्या साठी काठ्या गोळा करणाऱ्या पक्षांची शिकार करण्यासाठी मगरी हा धूर्त डाव खेळतात. आणि मगरी असं फक्त पक्षांच्या विणीच्या हंगामातच असं करतात, जेव्हा पक्षांना घरटी बांधुन त्यात अंडी द्यायची असतात.
काठ्या जमा करण्यासाठी पक्षी नकळत मगरीजवळ येतात आणि त्यांची शिकार बनतात.
मित्रहो, ही मगरींची customer acquisition strategy आहे. आपल्या ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी काय केलं पाहिजे हे मगरींनी नीट ओळखलं आहे. त्यासाठी पक्षांच्या गरजांचा त्यांनी नीट अभ्यास केला आहे.
तुम्ही तुमच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काय strategy वापरता? कस्टमर आपल्याकडे ओढला जावा म्हणून कोणता गळ वापरता? त्यासाठी तुमच्या कस्टमरचा, त्यांच्या गरजांचा सखोल अभ्यास तुम्ही केला आहे का?
निसर्गामधून बिझनेसबद्दल बरेच काही शिकता येतं. शेवटी दोन्हीकडे "Fight for Survival" रोजच असते.

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लार्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Http://learn.netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

निसर्गातील बिझनेस शिक्षण ! निसर्गातील बिझनेस शिक्षण ! Reviewed by Salil Chaudhary on 23:32 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.