"गुगल स्पेसेस" - गुगलचे नविन मेसेंजर अप्लिकेशन !

गुगलने नुकताच एक नविन ग्रुप मेसेजींग अ‍ॅप आणले आहे.


व्हॉट्स-अ‍ॅप, फेसबुक मेसेंजर, फेसबुक ग्रुप्स, गुगल प्लस, गुगल हँगआउट्स, स्नॅपचॅट एवढे सगळे मेसेजींग अ‍ॅप असताना गुगलला आणखीन एक नविन अ‍ॅप बाजारात आणण्याची आवश्यकता का भासली हे जरी अजून फारसं कुणाला कळलेलं नाही, मला तर वाटतं गुगललाही "स्पेसेस (Google Spaces)" असं नाव असलेल्या या अ‍ॅपचं काय करायचं ते नक्की माहिती नाहीये. म्हणूनच त्यांनी अगदी थोडी माहिती या अ‍ॅपबद्दल पुरविलेली आहे. "स्पेसेस"चा वापर लोक कसे करतात ते पाहुन नंतर पुढे स्पेसेस मध्ये काय डेवलपमेंट करायची ते गुगल ठरवेल असं दिसतंय.

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर, स्नॅपचॅट या मेसेंजर अप्लिकेशन्सची प्रगती पाहता इंटरनेटचं पुढील वर्ष हे मेसेजींग अप्लिकेशन्स गाजवणार आहेत हे नक्की ! त्यामुळे या बाजारात गुगलने प्रवेश करणं तसं अपेक्षीतच होतं....पण गुगलला फार उशीर झाला असं वाटतंय.

असो. स्पेसेस अ‍ॅप बद्दल जरा माहिती घेउया. आपण व्हॉट्सअ‍ॅप वर एखादा ग्रुप बनवतो, त्यामध्ये मित्रांना निमंत्रीत करतो. सुरुवातीला ग्रुप मध्ये खुप गडबड असते आणि काही दिवसानंतर शांतता पसरते. एकच मेसेच सगळ्या ग्रुप्सवर फिरत राहतो आणि ग्रुपचा मूळ विषय बाजूला राहून भलतेच वेळखाऊ मेसेज जागा व्यापुन टाकतात. किंवा एखाद्या विशीष्ट विषयासंबंधी चर्चा करता यावी म्हणून आपण फेसबुक ग्रुप बनवतो, पण ग्रुपमध्ये मेंबर वाढत जातात तसे ग्रुपमधील पोस्ट्स व चर्चांची पातळी खालावत जाते. ग्रुप अ‍ॅडमीनला या चर्चांवर नियत्रण आणणे शक्य होत नाही. आणि मग त्या ग्रुपचं मासळीबाजारात रुपांतर होतं. एकुणच काय एकतर ग्रुपचा विषय फार काळ टीकणारा नसतो किंवा ग्रुपचे मेंबर्स फार जास्त वाढणं उचित नसतं.

गुगलने ही पोकळी ओळखून "स्पेसेस"ची निर्मीती केली आहे. स्पेसेस म्हणजे एका विशिष्ट विषयाला धरुन बनविलेले छोटेखानी ग्रुप्स. यांना तात्पुरते ग्रुप्स म्हंटले तरी चालेल. म्हणजे समजा तुम्हाला मित्रांसोबत पिकनीकला जायचं आहे. तर त्याची चर्चा करायसाठी एक "स्पेस" बनविली आणि पिकनिक संपल्यावर ती स्पेस बंद करुन टाकली किंवा डीलीट करुन टाकली...असा गुगल स्पेसेसचा उपयोग होऊ शकतो.गुगल स्पेसेसची आणखी एक जमेची बाजू म्हणजे "Search". व्हॉट्स अ‍ॅप किंवा फेसबुक ग्रुप मधील मेसेज आपल्याला सर्च करता येत नाही. पण गुगल स्पेस मध्ये आपण जुने मेसेजेस शोधू शकतो. एवढचं काय आपण जुन्या मेसेजमधील चित्र देखिल शोधु शकतो. उदाहरणार्थ जर एखाद्या जुन्या मेसेजमध्ये आलेला झाडाचा फोटो आपल्याला शोधायचा असेल तर "Tree" असं सर्च केलं की तो किंवा तसे फोटो हजर !अर्थात शेवटी वापरणारे लोक याचा किती आणि कसा वापर करतील ते अजून कोणालाच ठाउक नाही...मुळात वापर करतील की नाही...हे देखिल माहित नाही. पण एकदा वापरुन बघायला नक्कीच हरकत नाही. आवडलं तर खुषाल वापरा...नाही आवडलं तर डीलीट करा.

गुगल स्पेसेस वेब, अँड्रोईड आणि आयओएस या तीनही प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. येथे क्लिक करुन ते डाउनलोड करता येईल. - https://get.google.com/spaces/करीअरसाठी उपयोगी असे अनेक विषय मराठीतून शिकविणारी "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"ची वेबसाईट तुम्ही पाहिलीत का ?

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"गुगल स्पेसेस" - गुगलचे नविन मेसेंजर अप्लिकेशन ! "गुगल स्पेसेस" - गुगलचे नविन मेसेंजर अप्लिकेशन ! Reviewed by Salil Chaudhary on 11:22 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.