व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच !


नमस्कार मित्रहो,
“युट्युबच्या माध्यामातून पैसे कसे कमवावेत?” या विषयावरील दोन यशस्वी वेबीनार्स नंतर आता नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन (online Seminar) वेबीनार “ व्यवसाय वाढीसाठी Linkedin मधील डावपेच !”
जगातील सगळ्यात मोठे प्रोफेशनल सोशल नेटवर्क म्हणून Linkedin आपणा सर्वांनाच माहितीआहे. पण दुर्दैवाने linkedin म्हणजे “ऑनलाइन बायोडाटा” असा समज आपण करून घेतला आहे. परंतु मित्रांनो, Linkedin हा केवळ Resume नसून Resource आहे. दर सेकंदाला दोन नवीन प्रोफाईल या सोशल नेटवर्क मध्ये तयार होत असतात. आणि मुख्य म्हणजे हे सर्व प्रोफाईल्स बिझनेस/प्रोफेशनल कारणासाठी बनवलेले असतात.
कोणत्याही व्यवसायाचं मुख्य काम असतं ते नवीन कस्टमर्स मिळवणं. आणि त्यासाठी वर्षानुवर्षे वापरात असलेल्या कोल्ड कॉलिंग , टेली कॉलिंग, बल्क ईमेल मार्केटिंग या पद्धती आता फारशा परिणामकारक राहिलेल्या नाहीत आणि खूप महागही झालेल्या आहेत. यासाठीच आपण सोशल मिडीयाचा एक “Sales Tool” म्हणून स्वीकार केला पाहिजे आणि प्रामुख्याने Linkedin चा!
मित्रांनो या वेबीनार मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे -
 1. योग्य नेटवर्क वाढविणे म्हणजे बिझनेस वाढविणे !
 2. Linkedin चा वापर करून आपण आपले बिझनेस नेटवर्क कसे वाढवायचे?
 3. lLnkedin मध्ये आदर्श प्रोफाईल कसे बनवायचे ?
 4. आपले प्रोफाईल Linkedin च्या सर्च मध्ये सगळ्यात पुढे कसे आणायचे ?
 5. आपल्या नेटवर्कचा व्यवसायासाठी फायदा कसा घ्यायचा ?
 6. LinkedIn मध्ये बिझनेस पेजचा फायदा कसा घ्यायचा ?
 7. Linkedin मध्ये आपले कस्टमर्स कसे शोधायचे ?
 8. कोणते ग्रुप्स जॉईन करायचे आणि ग्रुप्समध्ये काय/कसे बोलायचे ?
 9. Linkedin मधील आपले आदर्श कस्टमर्स असलेल्या प्रोफाईल्सचे “इमेल पत्ते” कसे मिळवायचे ?
 10. स्वत:ला एक “एक्स्पर्ट” म्हणून कसे दर्शवायचे ?
उद्योजकांनो, लक्षात ठेवा “कस्टमर मिळविणे” हे कधीच अपघाताने होत नसतं . त्यासाठी “Strategy” असणं, कस्टमर्सना आपल्याकडे आकर्षित करणारे डावपेच आखणं आणि ते अमलात आणणं आवश्यक असतं.
जर तुम्हाला linkedin हे मोफत सोशल नेटवर्क वापरून आपला बिझनेस वाढवायचा असेल तर आजच खालील लिंकवर क्लिक करून या वेबीनार साठी रजिस्टर करा. (फक्त १५ जागा उपलब्ध)
 1. हा वेबीनार फक्त व्यावसायीकांसाठी / उद्योजकांसाठी आणि सेल्स व मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे.
 2. वेबीनारची तारीख व वेळ - १ जून २०१६, दुपारी २ ते ५
 3. वेबीनारचे शुल्क - रुपये ५०० फक्त
 4. वेबीनारचा पूर्ण व्हिडीओ आणि प्रेझेंटेशन तुम्हाला नंतर केव्हाही पाहता येईल.
 5. वेबीनारच्या शेवटी Live Questions - Answers session असेल, ज्यामध्ये तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता.
 6. यासोबत नेटभेटचा “सोशल मिडीयाचा प्रभावी वापर” हा ऑनलाइन कोर्स तुम्हाला मोफत देण्यात येईल. हा कोर्स तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही पूर्ण करू शकता.
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
admin@netbhet.com
Netbhet E-learning Solutionsकरीअरसाठी उपयोगी असे अनेक विषय मराठीतून शिकविणारी "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"ची वेबसाईट तुम्ही पाहिलीत का ?

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच ! व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच ! Reviewed by Salil Chaudhary on 11:40 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.