उबर कंपनी आणि ग्राहक मानसशास्त्र


ऑनलाईन बिझनेस मध्ये अ‍ॅनॅलीटीक्सला प्रचंड महत्त्व आहे. आपल्या वेबसाईटमध्ये किंवा अ‍ॅपमध्ये आलेले ग्राहक नेमके कसे वागतात ? कुठे क्लिक करतात ? कोणत्या पानावर किती वेळ घालवतात ? पहिल्या
पानानंतर कुठे जातात ? किती वेळाने जातात ? कोणते प्रॉडक्ट्स पाहतात? कोणत्या लिंकवर क्लिक करतात ? असे एक ना अनेक गोष्टी सतत तपासल्या जातात आणि त्यानुसार वेबसाईट मध्ये किंवा अप्लिकेशनमध्ये
बदल केले जातात. असा बारीक सारीक डेटा नीट तपासून त्यातून बिझनेससाठी फायदेशीर ठरतील असे निष्कर्ष काढणार्‍या या हुशार जमातीला "डेटा सायंटीस्ट" असे नाव आहे.

मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे नुकताच वाचनात आलेला "उबर UBER" या कंपंनीबद्दलचा लेख. उबर ही कंपनी म्हणजे टॅक्सी सेवा पुरवणारे एक अप्लिकेशन आहे. थोडक्यात जरी आपल्याला उबर ही वाहतूक व्यवसायातील कंपनी वाटली तरी ती एक सॉफ्टवेअर कंपनी आहे.

तर उबरच्या प्रमुख डेटा साइंटीस्ट "कीथ चेन (Keith Chen)" यांनी नुकताच त्यांच्या ग्राहकांच्या एका विशिष्ट सवयीबद्दल खुलासा केला. उबरमध्ये "सर्ज प्रायसिंग (Surge Pricing)"हा एक प्रकार आहे. म्हणजेच जेव्हा गाड्यांची मागणी जास्त असते (ऑफीस सुरु होण्याच्या किंवा सुटण्याच्या वेळेला) तेव्हा ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतात. बर्‍याचदा हे दर सामन्य दराच्या दुप्पट किंवा तिप्पट असतात.

कीथ चेन यांना आढळलं की जेव्हा मोबाईलची बॅटरी संपत आलेली असते तेव्हा लोक दुप्पट , तीप्पट नव्हे तर
तब्बल नऊपट पैसे दद्यायला तयार होतात. कारण मोबाईल बंद झाला तर दुसरी टॅक्सी मिळविणे जिकीरीचे जाईल हे ग्राहकांना माहित असते आणि म्हणून ते जास्तीचा दर द्यायला तयार होतात.

पण हेच जर मोबाईल चार्ज असेल तर मात्र दुसरी टॅक्सी मिळेपर्यंत वाट पाहतात.  आणि मुख्य म्हणजे उबरच्या अ‍ॅप मधून ग्राहकाच्या फोनमधील बॅटरीचा चार्ज किती शिल्लक आहे हे देखिल कंपनीला कळत असतं. अर्थात या माहितीचा कंपनी कधिही गैरफायदा घेत नाही असं चेन यांनी सांगीतलं. (विश्वास ठेवायचा की नाही ते सर्वांनी आपापलं ठरवावं)!

अ‍ॅप इंस्टॉल करत असताना, आपल्याला बर्‍याच "परवानग्या" विचारल्या जातात. त्या सर्व परमिशनमधून या अ‍ॅपच्या कंपन्या काही न काही डेटा जमा करत असतात. तेव्हा या परमिशन्स देताना जरा जपूनच !

आणखी एक गोष्ट चेन यांनी सांगीतली ती म्हणजे जेव्हा "सर्ज प्रायसिंग" २ पट ( 2X )असते तेव्हा लोक टॅक्सी बुक करायला मागेपुढे पाहतात. कारण त्यांना वाटते की कंपनी सरसकट दुप्पट दर लावत आहे.
पण जर दर २.१ पट ( 2.1X) असले तर मात्र लगेच टॅक्सी बुक करतात. कारण २.१ हा दर कंप्युटरने गाड्यांची उपलब्धता पाहून आपोआप ठरवला आहे असे त्यांना वाटते.

आहे की नाही गंमतीशीर ! मित्रांनो यालाच म्हणतात "कंझ्युमर सायकोलॉजी".

तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये "कंझ्युमर सायकोलॉजी"चा वापर करता का? तुमच्या ग्राहकाबद्द्ल इतकी बारीक सारीक माहिती मिळवता का ? मिळविली तर त्या माहितीचा व्यवसाय वाढीसाठी उपयोग करता का?


व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच !


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


उबर कंपनी आणि ग्राहक मानसशास्त्र उबर कंपनी आणि ग्राहक मानसशास्त्र Reviewed by Salil Chaudhary on 10:58 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.