सोशल मिडीया मुळे आता वेबसाईटची गरज उरली आहे का?


सोशल मिडीया ट्रेनिंग मध्ये एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो. जर आपले ग्राहक सोशल मिडीयावर आहेत, आपलं कंटेंट (आपण लिहिलेल्या पोस्टस, लेख, फोटो, व्हीडीओ इत्यादी) सोशल मिडीयावर आहे तर मग आता वेबसाईटची गरज उरली आहे का? वेबसाईट हा एक "खर्च" आम्ही कमी करु शकतो का?
मित्रहो कदाचित तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल ? म्हणूनच आज मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे.
एक उदाहरण देतो. समजा तुम्हाला घर बांधायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही एक जागा शोधत आहात. तुमच्याकडे जागेचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक जागा तुम्हाला पैसे देऊन खरेदी करायची आहे आणि दुसरी जागा तुम्हाला मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
तुम्ही दोन्हीकडे घर बांधू शकता. पण पहिल्या जागेवर तुमचा मालकी हक्क राहणार आहे आणि दुसर्‍या जागेवर तुम्ही राहू शकता पण तरीही तुमची मालकी मात्र नसणार. मला सांगा तुम्ही यापैकी कोणता पर्याय निवडाल?
मी यातला पहिला पर्याय निवडेन. कारण जर मला घर बांधायचा खर्च करायचा आहे तर मी तो माझ्या मालकीच्या जागेवर करेन. त्यामध्ये आता मला खर्च करावा लागला तरी दुरचा फायदा आहे.
मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की वेबसाईट ही आपली मालकीची जागा आहे आणि सोशल मिडीया ही मोफत मिळालेली आणि दुसर्‍याच्या मालकीची जागा आहे.
सोशल मिडीया ही "मार्केटींग"ची जागा आहे....पण "सेल्स"साठी आपली वेबसाईटच महत्त्वाची आहे. आणि सोशल मिडीयामध्ये आपण ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी जे काही काम करतो, त्याचा मुख्य उद्देश ग्राहकांना आपल्या वेबसाईट कडे वळवणे हाच असला पाहिजे.
स्पेशल‬ टीप -
सोशल मिडीयावरील आपले फॅन्स, लाईक आणि शेअर करणारे फॉलोअर्स यांचे ईमेल पत्ते जमा करण्यासाठी आपल्या वेबसाईटचा वापर करा. त्यामुळे उद्या जरी फेसबुक्/लिंकड-इन इत्यादी बंद झाले किंवा बदलले तरी तुमच्या ग्राहकांच्या तुम्ही थेट संपर्कात राहू शकाल.
मित्रहो‬, मला खात्री आहे हा लेख तुम्हाला आवडला असेल. "आपल्या वेबसाईटचा "सेल्स मशिन" म्हणून प्रभावीपणे वापर कसा करावा ?" हा या लेखाचा दुसरा भाग  तुम्हाला ईमेलद्वारे पाठविला जाईल. त्यासाठी आजच आमच्या वेबसाईटवर सबस्क्राईब करा (इमेल पत्ता द्या).
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


सोशल मिडीया मुळे आता वेबसाईटची गरज उरली आहे का? सोशल मिडीया मुळे आता वेबसाईटची गरज उरली आहे का? Reviewed by Salil Chaudhary on 23:42 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.