बिझनेस्य कथा रम्यः ! गो-एअरची अनोखी कॉस्ट कटींग योजना !


कोणत्याही उद्योगात नफा मिळविण्यासाठी दोन गोष्टी करणे आवश्यक असते. पहिलं म्हणजे पैसे कमवणेआणि दुसरं म्हणजे पैसे वाचवणे. यापैकी "पैसे वाचवणे" प्रकार कॉस्ट कटींगच्या रुपाने समोर येतो म्हणून तो फारसा स्वागतार्ह नसतो. परंतु त्यामुळे कॉस्ट कटींगचे व्यवसायातील महत्त्व कधीच कमी होत नाही.


मित्रहो, आज मी तुम्हाला एका कंपनीने राबविलेल्या अनोख्या कॉस्ट कटींग बद्दल सांगणार आहे. बिझनेस यशस्वी करण्यासाठी जसे मोठे मोठे निर्णय घ्यावे महत्त्वपुर्ण ठरतात, तितकेच काही क्षुल्लक वाटणारे लहानसे निर्णयही उपयोगी ठरतात. त्यामुळे अशा दुर्लक्ष करता कामा नये.

२०१३ मध्ये भारतातील गो-एअर या विमान वाहतुक कंपनीने डॉलर्सच्या वाढत्या किंमतीमुळे वाढणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अनोखा निर्णय घेतला. विमानामधील कर्मचारी (Cabin Crew) मध्ये फक्त महिलांचाच समावेश करायचे गो-एअरने ठरविले. कारण महिलांचे वजन हे पुरुषांपेक्षा किमान १५-२० किलोने कमी असते. विमानामधील प्रत्येक एक किलो वजनामागे ईंधन खर्च प्रतीतास ३ रुपये इतका वाढतो. महिला कर्मचार्‍यांमुळे हा खर्च बराचसा कमी ठेवता येतो. यामुळे गो-एअरला वार्षीक ३ करोड रुपये वाचविता आले. अर्थात ही काही फार मोठी बचत नाही आहे. परंतु अशा छोट्या छोट्या बचतीच्या योजनांमुळेच गो-एअर बरेच वर्ष नफ्यात राहिली आहे. (भारतातील इतर सर्व विमान कंपन्या तोट्यात आहेत!)

या योजनेचा दुसरा फायदा म्हणजे गो-एअरची ही कल्पना जगभरातील वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये छापून आली. त्यामुळे कंपनीची मोफत जाहिरात झाली.

उद्योजकांनो, व्यवसाय वाढविणे म्हणजे एका मोठ्या हौदाला पाण्याने भरण्यासारखे आहे. अधिक पाणी या हौदात भरले पाहिजेच पण कुठे गळती थांबविता येईल याचा देखिल विचार केला पाहिजे.आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही.
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक मराठी कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत.
अधिक माहितीसाठी भेट द्या - http://learn.netbhet.com
मातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा !


सलिल सुधाकर चौधरी
Founder - Netbhet eLearning Solutions
Trainer - Business Growth and Digital Marketing
http://Learn.netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

बिझनेस्य कथा रम्यः ! गो-एअरची अनोखी कॉस्ट कटींग योजना !  बिझनेस्य कथा रम्यः ! गो-एअरची अनोखी कॉस्ट कटींग योजना ! Reviewed by Salil Chaudhary on 00:29 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.