कमी काम , जास्त उत्पादकता !

मित्रांनो, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे करणे म्हणजे Productivity (प्रॉडक्टीव्हीटी - उत्पादकता), असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो एक गैरसामज आहे. खरंतर Productivity म्हणजे कमी कामे करणं ! Productivity is all about doing less !

माझं हे विधान कदाचित तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल ! मी एका उदाहरणाने हे समजावण्याचा प्रयत्न करतो. समजा एका व्यक्तीने एका तासात दहा कामे पुर्ण केली आणि दुसर्‍या व्यक्तीने एका तासात दोन कामे पुर्ण केली. तर तुम्ही दोघांपैकी कोणाला जास्त Productive म्हणाल? दहा कामे केली त्याला म्हणाल की दोन कामे केली त्याला ! 

तर मित्रांनो हे ठरतं की त्यांनी जी कामं केली ती कामं किती महत्त्वाची होती त्यावर. म्हणजेच जर दोन कामे केली परंतु ती अतिशय महत्त्वाची असतील आणि दहा बेसीक कामे केली ज्याचा फारसा परीणाम होणार नसेल तर दोन महत्त्वाची कामं तुम्हाला जास्त Productive बनवतील !

थोडक्यात, Productivity किती कामं यापेक्षा कोणती कामं यावर अवलंबून असते. हे कसं साध्य करायचं ते सांगणारा हा व्हीडीओ तुम्हाला नक्की खुप आवडेल !Time management किंवा वेळ व्यवस्थापन हा तसा सोपा विषय आहे. पण कठीण आहे ते अमलात आणणं. त्यासाठी "Time management" चे तंत्र शिकून ते शिस्तपुर्वक अमलात आणले पाहिजे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्यानंतर कोणते काम , कधी करायचे याचे नियोजन केले पाहिजे.

Time management मराठीतून शिकविणारा कोर्स , नेटभेटने मोफत उपलब्ध करून दिलेला आहे ! नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सच्या वेबसाईटला (http://learn.netbhet.com/) भेट देऊन या कोर्सचा अवश्य फायदा घ्या !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

कमी काम , जास्त उत्पादकता ! कमी काम , जास्त उत्पादकता ! Reviewed by Salil Chaudhary on 00:05 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.