गुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords ?


मित्रांनो आज आपण एक उपयुक्त टीप सांगणार आहे.

ईंटरनेटवर वावरत असताना आपण बर्‍याच वेबसाईट्स मध्ये आपले अकाउंट सुरु करतो. प्रत्येक वेबसाईटसाठी एक युझरनेम आणि पासवर्ड आपण ठरवलेला असतो.

परंतु होते काय, काही दिवसांनंतर आपण हे पासवर्ड आणि युझरनेम विसरुन जातो. पुन्हा जेव्हा लॉग-इन करायची वेळ येते तेव्हा पासवर्ड पुन्हा निवडण्याशिवाय (पासवर्ड रीसेट) पर्याय नसतो. यामध्ये आपला बराच वेळ जातो. हा वेळ वाचविण्यासाठी आणि सतत पासवर्ड रीसेट करण्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग आपल्याला गुगलने दिला आहे. किमान काही वेबसाईट्स आणि काही अ‍ॅप्सच्या बाबतीत तर हा उपाय काम करतोच. त्यासाठी फक्त तुम्ही Google Chrome किंवा Android वापरला असला पाहिजे.

म्हणजेच ज्या ज्या वेबसाईट्स आपण गुगल क्रोम वापरुन पाहतो त्या वेबसाईट्सचे आपण save केलेले पासवर्डस आपल्याला पाहता येतात. ते कसे पहायचे हे समजावून सांगणारा एक व्हीडीओ मी बनविलेला आहे. नेटभेटच्या वाचकांसाठी हा व्हीडीओ मी येथे देत आहे.


हा व्हीडीओ आणि ही युक्ती तुम्हाला कशी वाटली ते मला खाली कमेंट्स मध्ये लिहुन नक्की कळवा. तसेच असे आणखी कोणत्या विषयावरील व्हीडीओ आम्ही बनविले पाहिजेत याबद्दल काही सूचना असल्यास जरुर कळवा !
  मराठीतून मोफत ऑनलाईन कोर्सेस मिळविण्यासाठी आजच भेट द्या - "मातृभाषेतुन शिकुया , प्रगती करुया !"Learn.netbhet.com
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
Http://Learn.netbhet.comGet NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

गुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords ? गुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords ? Reviewed by Salil Chaudhary on 03:55 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.