बिझनेस्य कथा रम्य: ! उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण !


मित्रहो, कोणतेही Self Help किंवा Business Book वाचण्यापेक्षा मोठमोठ्या उद्योजकांची आत्मचरीत्रे वाचावीत. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी, वेळोवेळी त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्याला खुप काही शिकवून जाते.


प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांचा असाच एक किस्सा मला खुप भावला. आणि नेटभेटच्या वाचकांसोबत तो मला शेअर करावासा वाटला.

किस्सा १९९० चा आहे. तेव्हा गौतम अदानी त्यांच्या तिशीत होते. अदानी एक्स्पोर्ट्सच्या एका कर्मचार्‍याने साखरेच्या व्यवहारात ( Commodity Trading) एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कंपनीला सुमारे २० करोडचं नुकसान झालं.

आता आपल्याला नोकरीमधून काढण्यात येईल या भीतीने त्याने आपणहून माफी मागीतली आणि गौतम अदानींकडे आपला राजीनामा दिला.

गौतम अदानींनी त्याचा राजीनामा फेकून दिला आणि ते हसून बोलले, " मला माहित आहे की या प्रकरणातून तू शिकला आहेस आणि अशी मोठी चूक तू पुन्हा करणार नाहीस. आणि आता जर मी तुझा राजीनामा स्वीकारला तर
तु मिळवलेल्या या शिकवणीचा फायदा तुझ्या नविन कंपनीला होईल पण त्याची किंमत मात्र मी मोजलेली असेल."

मित्रांनो छोटासा असला तरी हा किस्सा बरेच काही शिकवून जातो. कर्मचारी ही कोणत्याही उद्योगाची सगळ्यात सगळ्यात जमेची बाजू असते. त्यांना सांभाळणं, सुधारणं आणि मग त्यांच्याकडून जबाबदारीची कामे करुन घेणे हे एका
कुशल लीडरचे काम असते.

You dont build Businesses. You build people and They build your Business ! - Zig Ziglar

==================================================
आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही.

नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मध्ये तुमचं करिअर पुढे न्यायला मदत करतील असे अनेक कोर्सेस आहेत. कधीही , केव्हाही आणि कुठेही, आपल्या वेगाने आणि आपल्या सवडीने शिकता येतील असे हे कोर्सेस अवश्य करा. यापैकी काही कोर्सेस पूर्णपणे मोफत आहेत.

अधिक माहितीसाठी भेट द्या - http://www.netbhet.com

मातृभाषेतून जास्तीत जास्त , सर्वोत्तम शिक्षण देण्याच्या आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा !
==================================================
सलिल सुधाकर चौधरी
Founder - Netbhet eLearning Solutions
Trainer - Business Growth and Digital Marketing
www.netbhet.com

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

बिझनेस्य कथा रम्य: ! उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण !  बिझनेस्य कथा रम्य: ! उद्योजक कसा विचार करतात त्याचे अप्रतीम उदाहरण ! Reviewed by Salil Chaudhary on 07:48 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.