Square off - जगातील आत्तापर्यंतचा सर्वात विकसित बुध्दिबळपट

Square off- जगातील आत्तापर्यंतचा सर्वात विकसित बुध्दिबळ्पट


           
आजपर्यंत आपल्यापैकी अनेकांनी बुध्दिबळाचा (chess) खेळ खेळला असेल्.दोन प्रतीस्पर्धी समोरासमोर्.... नंतर ह खेळ आपण संगणकाबरोबरही खेळलो.पंरतु ज्याप्रमाणे संगणक स्वत: सोंगट्या हालवितो....ते संगणकाबाहेर पहायला मिळ्णे हे थोडेसे अशक्य वाटत असले तरी ते वास्तव रुपात मांड्ण्याचा यशस्वी प्रयत्न भव्य गोइल(CEO) आणि अतुल मेहता(CTO) यांनी केला.

त्यांनी या खेळाला एक नवीन अविष्कार दिला.Square off हा बुध्दिबळाच्या बोर्ड्चा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विकसित केलेला बोर्ड आहे. हा Board  भव्य गोइल आणि अतुल मेहता यांनी विशिष्ट आधुनिक machines चा वापर करुन विकसित केला आहे.Board चा वरिल प्रूष्ठभाग हा आपल्या नेहमीच्या खेळातील बुध्दिबळाच्या प्रूष्टभागासार्खाच आहे.पंरतु प्रुष्टभागाखाली विशिष्ट Tecnology चा वापर केला आहे,आणि त्यामुळे हा Square off board मुळ पारंपारीक board पेक्षा वेगळा आहे. यातील प्रत्येक सोंगटी चुंबकाच्या सहाय्याने हलवली जाते.
         
Square off board व Mobile तंत्रज्ञान या दोघांचा अतिशय सुन्दर ताळ्मेळ साधुन हा खेळ आपण जगाच्या पाठिवर कूठेहि असलेल्या आपल्या प्रतीस्पर्ध्यासह खेळू शकतो आणि आपल्या ज्ञानातही भर पडते. या खेळाविषयी जास्त उस्तुकता वाढते.आपोआप हालणार्या सोंगट्या हा या खेळातील एक उत्तम अविष्कार आहे. संबधित Training appच्या सहय्याने आपणांस हा खेळ शिकण्यास मदतही होते.तसेच खेळ   खेळत असतानाही आपण आधी खेळल्या गेलेल्या Chess expert खेळांडूचा खेळांचा आढावाही घेउ शकतो.

हल्ली सर्रास बहुतेक बैठे खेळ मोबाईल आणि संगणकावर खेळले जातात. स्क्वेअर ऑफ या नव्या चेसबोर्डने मात्र पारंपारिक खेळ आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा छान मेळ घालून बैठ्या खेळांच्या दुनियेत एक नवी जान आणली आहे हे नक्की !Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Square off - जगातील आत्तापर्यंतचा सर्वात विकसित बुध्दिबळपट Square off - जगातील आत्तापर्यंतचा सर्वात विकसित बुध्दिबळपट Reviewed by Salil Chaudhary on 06:45 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.