काळाचा महिमा अगाध आहे.

काल डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि सध्या विजय मल्ल्या कर्ज बुडवून भारतातून पळून गेले आहेत. तुम्ही म्हणाल, या दोन्ही गोष्टींचा काय संबंध ?


तसा डायरेक्ट संबंध नाही आहे. पण हा १९९८ सालचा "विजय मल्ल्या" यांच्या मुलाखतीचा व्हीडीओ पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल.

१९९८ सालच्या या मुलाखतीत विजय मल्ल्या यांना विचारलं गेलं होतं की तुम्हाला भारतातला "डोनाल्ड ट्रंप" मानलं जातं , याबाबत तुम्हाला काय वाटतं ?
मल्ल्यांनी उत्तर दिलं की "मी डोनाल्ड ट्रंप याना प्रत्यक्ष कधी भेटलो नाही. त्यामुळे मी भारताचा "डोनाल्ड ट्रंप" आहे का हे मला सांगता येणार नाही. पण एवढ नक्की मी त्यांच्यासारखा "कर्जबाजारी ( Bankrupt )" तर नक्कीच नाही.

आता काळाचा महिमा तुमच्या लक्षात आला असेल. डोनाल्ड ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि सध्या विजय मल्ल्या कर्ज बुडवून भारतातून पळून गेले आहेत.

डोनाल्ड ट्रंप कठीण समयी देश सोडून "पळून" गेले नाहीत आणि म्हणूनच आज ते देशाच्या सर्वोच्च पदी पोहोचले आहेत.

कालाय तस्मै नमः !

( काळाचा महिमा खरच अगाध आहे, न जाणो उद्या कदाचित मल्ल्या परत येऊन राष्ट्रपती होतील :-) )

सलिल सुधाकर चौधरी
संस्थापक - नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सGet NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

काळाचा महिमा अगाध आहे.  काळाचा महिमा अगाध आहे. Reviewed by Salil Chaudhary on 23:52 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.