पृथ्वीचा स्वत:चा मॅनेजमेंट बोर्ड !


कल्पना करा की एक अशी कंपनी आहे, जिच्या बोर्डचा चेअरमन "बिल गेटस" आहे. आणि वर्जिन ग्रुपचे रिचर्ड ब्रँसन, अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझॉस, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग, लिंक्डईनचे रीड हॉफमॅन, अलिबाबाचे जॅक मा, जपानचे मामायोशी सन, आणि भारताचे रतन टाटा असे एकाहून एक अव्वल दर्जाचे बिझनेसमन मंडळी या कंपनीच्या बोर्डमध्ये सल्लागाराची भूमिका बजावत आहेत.
मित्रांनो, ही केवळ एक कल्पना नसून गेल्याच आठवड्यात प्रत्यक्षात उतरलेली सत्य घटना आहे. Breakthrough Energy Ventures या नव्या बिलियन डॉलर फंडची ही बोर्ड टीम आहे. या नव्या फंडचं कामही तितकच अवाढव्य आणि महत्वाचं असणार आहे.
या फंडचं काम आहे अशा कंपन्या शोधून त्यामध्ये गुंतवणूक करायची, ज्या पृथ्वीवरील हरितगृह वायू ( Green house Gases) कमी करणारी उत्पादने/ सेवा बनवतील. यासाठी वरील सर्व मोठी बिझनेस मंडळी आपला अनुभव आणि ज्ञान आणि पैसा या फंडच्या माध्यमातून गुंतवतील. थोडक्यात काय तर "पृथ्वीला" आता स्वतःचा मॅनेजमेंट बोर्ड मिळालेला आहे :-)
पृथ्वीला आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांना, भावी पिढ्यांना वाचविण्यासाठी आता नविन संशोधनांची गरज आहे हे ओळखून जगातील सर्वात श्रीमंत माणूस "बिल गेटस" याने पुढाकार घेऊन या फंडची सुरुवात केली आहे.
खालील पाच मुख्य बाबींवर या फंडच्या माध्यमातून काम केले जाणार आहे -
१. Electricity वीजनिर्मीती - जगाला स्वस्त, विश्वासार्ह आणि कार्बनमुक्त वीजपुरवठा करणे
२. Buildings आस्थापने - घरे, ऑफिसेस, ईस्पीतळे, शाळा इत्यादी आस्थापनांमध्ये तयार होणारे हरितगृह वायुंचे प्रमाण कमी करणे
३. Manufacturing उत्पादन - पृथ्वीला हानिकारक न ठरता सर्व प्रकारचे उत्पादन करणे
४. Transportation दळणवळण - कार्बन वायुचे उत्सर्जन टाळून , प्रदूषणमुक्त दळणवळणाची साधने निर्माण करणे
५. Food अन्न - हवामान बदलास (Climate Change) कारणीभूत न ठरता सर्व पृथ्वीवासियांची भूक भागविणे
मित्रांनो, बिल गेटस नेहमी मोठा विचार करतो. ही एक गोष्ट यातून आपण नक्कीच शिकली पाहिजे. जाती-पाती, गरिब -श्रीमंतीच्या पुढे जाऊन सर्व पृथ्वी वासियांचे प्रश्न मोठे आहेत आणि आपण सर्वांनीच त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. निदान आपल्यापुरता वायू, पाणी, जमिनीचे प्रदूषण रोखण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे.
बिल गेटसच्या या महाप्रयत्नाला यश येईल आणि येत्या काही वर्षात आपण सध्या वापरत असलेल्या अनेक सेवा-सुविधांना "शुद्ध" पर्याय उपलब्ध होतील याची मला खात्री आहे.
सलिल सुधाकर चौधरी
www.netbhet.com
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकुया, प्रगती करुया !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

पृथ्वीचा स्वत:चा मॅनेजमेंट बोर्ड ! पृथ्वीचा स्वत:चा मॅनेजमेंट बोर्ड ! Reviewed by Salil Chaudhary on 01:21 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.