अतिपरिणाम कारक लोकांचा सात सवयी


मित्रांनो आपलं आयुष्य कसं असणार हे आपल्या सवयीवरुन ठरत असतं.आपल्या सवयीच आपल्या यशाचं किंवा अपयशाचं प्रमुख कारण बनतात आणि म्ह्णुनच आपल्या हे माहिति पाहिजे कि कोण्त्या सवयी आपण अंगीकारल्या पाहिजेत आणि कोणत्यासोडून दिल्या पहिजेत.

म्ह्णूनच मित्रानो आज या video मध्ये मी आपल्या ७ अश्या सवयी सांगंणार आहोत ज्या आपल्याला effective बनवतात.

7 habits of highly effective people म्हणजेच "अतिपरिणाम कारक लोकांचा ७ सवयी या स्टीवन कवी यानींलिहिलेल्या जगप्रसिदध पुस्तकातुन या सवयींबदद्ल् लिहिण्यात आले आहे

पहिली सवय-Be Proactive


बरेच लोक सतत काहीना काहीतरी तक्रार करत असतात्.महागाई वाढ्लीय्,रस्ते बरोबर नाही,सरकार बरोबर नाही...अश्या अनेक तक्रारी ते सतत करत असतात हे असतात reactive लोक. हे लोक स्वत: कसलीच responbility घेत नाहीत आणि सतत दुसर्‍या कोणालातरी दोष देत असतात

    देश प्रगती क॑रत नाही कारण सरकार बरोबर नाही,त्यांच प्रमोशन होत नाही कारण बॉस बरोबर नाही,त्यांच इतरांशी पटत नाही कारण आसपासचे लोक बरोबर नाही.त्यांच्यामते एकतर त्यांच नशीब खराब आहे किंवापरिस्थिती योग्य नाही.खरं म्हणजे त्यांची ही विचार्रसरणी हाच त्यांचा खरा प्रॉब्लेम आहे.याउलट Proactive लोक आपल्या feelings चा control इतरांना देत नाही.ते स्वतः पुर्ण जवाबदारी घेउन काम करतात. नशिबाला दोषदेण्यापेक्षा या situations मध्ये काय चांगलं करता येइल focus यावर करतात.

                        मग Proactive कसं बनायच?

पहील्यांदा हे समजुन घेतलं पाहिजे की जीवनात दोन वर्तुळे असतात्,पहिला ज्यावर आपला काहीच control नसतो जसकी हवामान्,तुमचे शिक्षक्,तुमच्या पालकांची एपत्,गव्हर्नमेंट्,अर्थव्यवस्था इ..आणि दुसरं वर्तुळ असतं ज्यावर तुमचा पुर्ण  control असतो.कीती काम करायचं,कीती अभ्यास करायचा,कोणती पुस्तके वाचायची,काय प्रतिक्रिया द्यायच्या हे सर्व तुम्हाला ठरवायच असतं.

दुसरी सवय आहे - Being with the end in mind.

कल्पना करा की तुम्ही एका व्या़क्तीच्या अंन्यदर्शनाला गेला आहात पण ती व्याक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतच आहात. त्यावेळी तुमचे मित्र, सहकारी, कुटुंबीय यांनी तुमच्या बद्द्ल काय बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे याचा विचार करा.

हा एक चांगला मित्र होता असं तुमच्या मित्रानी म्हणावस तुम्हाला वाटत असेल तर खरच तुम्ही एक चांगला मित्र बनण्यासाठी कही करत आहात का?

हा एक यशस्वी आणि मेहनती माणुस होता अंस इतरांनी म्हणावसं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही आजच पावलं उचलत आहात का? मेहनत करत आहात का?

स्वतःला विचारा की तुमचं अंतिम ध्येय काय आहे आणि त्यावर काम करायला आजच सुरवात करा.

तिसरी सवय - Put first things first

स्टीवन कवीच्या सात सवयां मध्ये ही सगल्यात सोपी सवय वाटते परंतु तरीही बर्‍याच जणांना कठिण जाते.आपण सर्वजण बराच वेळ अशा गोष्टीत घालवतो ज्या आपल्याला काहिच उपयोगी नसतात.

कधीकधी मीउगाचच facebook किंवा youtube video पाहत राहतो आणि खूप वेळ वाया घालवतो,याएवजी मी महत्वाची कामं करण्यावर भर दिला पाहिजे.आपलं उद्दिष्ट गाठायचे असेल तर नक्कीच या गोष्टी आपण टाळल्यापाहिजेत्.महत्वाच्या कामांमधेच आपला जास्तीत जास्त वेळ आपण खर्च केला पाहिजे.वेळ पैशाहून अधिक जपून वापरला पाहिजे.

चौथी सवय-Think win win

आपल्याला लहाणपणापासुन फक्त win-lose हे एकच समीकरण शिकवलेलं असतं.परंतु bussiness  किंवा profesonal life आपण win win situation मिळ्वू शकतो ज्यामध्ये सर्वांचाच फायदा होतो. एक माणुस त्याचीकार ऑफिसच्या बाहेर पार्क करत असे.तिथे खेळणारी काही खोडकर मुलं नेहमी तो माणुस आत गेला कि त्या गाडीवर ओरखडे मारत असत्.

त्या माणसाने त्या सर्व मुलांना ओरडण्याएवजी एक दिवस खुप खुप खाऊ नेउनदिला...झालं त्यानंतर ती मुलं गाडीला काही नुकसान पोहचवण्याएवजी उलट त्या गाडीची काळ्जी घेउ लागले.

मित्रांनो असच जर आपण आपल्या आपल्या सहकार्‍यांबद्दल आपल्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल  win winविचार केला तर नक्किच यातून सर्वांना आनंद होइल

पाचवी सवय-Seek first to understand then to be understood

नेट्भेट्चे video Youtube मध्ये बघणार्‍यां प्रत्येकानं माझ्या channel लाsubscribe करावं अशी माझी इच्छा असते.पर्ंतु मी कधीही हे सांगत नाही की हे video बनविण्यासाठी मी खुप मेहनत करतो किंवा मी खुप वेळ वाया घालवतो म्हणुन माझ्या channel ला subscribe करा.मी सागंतो की आमचे video तुम्हाला आवडले आणि उपयोगी ठरले तर subscribe करा.

मी जर तुम्हाला काय हवय ते दिलं नाही तर सहाजिकच तुम्ही मला जे हवं ते देणार नाही हीच आहे परीणामकारक माणसांची पाचवी सवय-आधी समोरच्याला समजुन घ्या तरच ते तुम्हाला समजुन घेतील.

सहावी सवय-Synergy

कल्पना करा एका झाडावर ५ सफचंदं लटकली आहेत आणि झाडाखाली दोन माणसं आहेत्.त्या दोघांचीही उंची इतकी नाही कि ते झाडावरुन सफचंदं काढू शकतील पण जेव्हा ते एकत्र येतात आणि एकजण दुसर्‍याच्या खांद्यावर चढून फळ काढ्तो तेव्हा त्या दोघानाही ५ही सफचंदं मिळ्तात्.यालाच म्हणतात Synergy.

Personal किंवा professional life मध्ये आपल्या टीमधील इतर लोकांची ताकद ओळ्खून जर प्रत्येकानं एकत्रित्रित्या काम केलं तर ते काहीही achive करणं अशक्य नाही.एकटा माणूस कीतीही चांगला असला तरी तोटीमपेक्षा कमीच असतो.इतरांसोबत तुम्ही जेवढ्या synergies तयार कराल तेवढेच पुढे जाल हे निश्चितच..

सातवी सवय-Sharpen the saw

एक मानुस बराच वेळ एक झाड कापण्याचा प्रयत्न करत होता.खूप वेळ प्रयत्न करून सुद्धा त्याचं काम होत नव्हता.तेवढ्यात त्याचा शेजारी तिथे आला आणि बोलला कि तु तुझ्या करवतीला धार का करत नाहीस? तो माणूस थोडा वेळ थाबंतो आणि म्हणतो "बरोबर आहे ,पण त्यासाठी माझा वेल वाया जाइल ना.."

मित्रांनो हे उत्तर मुर्खपणाचं वाटतं आपण सर्वजण आपल्या आयूष्यात काहीसं असच करत असतो.आपलं शरीर,आपलं मन,आपलं मेंदू यांना आपण पुरेसा आराम देतो का?ही आपली हत्यारे आहेत त्यांना धार काढणं अतिशय महत्त्वाचं आहे.

तर मित्रांनो ह्या होत्या स्टिवन कवी यांनी सांगितलेल्या सात परिणामकारक सवयी!हे पुस्तक मराठीमधेही उपलब्ध आहे या vidio च्या खाली मी link देत आहे तेथे clickकरुन तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता.आपल्याआयुष्यामध्ये आमूलाग्र बदल करायचा असेल तर या सवयी नक्की आपल्या अंगी बाणवा!ALL THE BEST

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

अतिपरिणाम कारक लोकांचा सात सवयी अतिपरिणाम कारक लोकांचा सात सवयी Reviewed by Salil Chaudhary on 21:24 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.