नेटभेटची "युट्युब मास्टरक्लास" कार्यशाळा

काल पुणे येथे नेटभेटची "युट्युब मास्टरक्लास" ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण झाली. पुण्यामध्ये नेहमीच नेटभेटला "हाउसफुल्ल" प्रतिसाद मिळत आला आहे, तसाच तो या कार्यशाळेलाही मिळाला.
युट्युबच्या दुनियेची रंजक सफर आणि या माध्यमातून सोप्या पद्धतीने पैसे कमावण्याची गुरुकिल्ली सर्वच प्रशिक्षणार्थींना मिळाली.
मुंबई, अलिबाग, पुणे, जळगाव, सातारा, नाशिक अशा विविध ठिकाणांहून प्रशिक्षणार्थी या कार्यशाळेसाठी आले होते.
या बॅचमध्ये आलेल्या काही प्रशिक्षणार्थींना विविध चविष्ट पदार्थांच्या रेसीपींचा युट्युब चॅनेल बनवायचा होता, कोणाला आदिवासी भागातील कला जगासमोर आणायच्या होत्या, काही जणांना विविध सॉफ्टवेअर्स, गॅजेट्स इत्यादींची माहिती युट्युबमार्फत जगाला द्यायची होती.
शिवशाहिर, सहकार शास्त्राचे अभ्यासक, मुलांना मजेशीर पद्धतीने विज्ञान आणि गणित विषय शिकविण्याची ईच्छा असणारे शिक्षक, शॉर्टफिल्म, वेबसीरीज, आध्यात्मिक व्हिडीओ बनवणारे कलाकार अशा अनेकांगी, बहुआयामी व्यक्तीमत्वांनी कालचा वर्ग भरला होता.
युट्युबच्या माध्यमातून आपला छंद जोपासून त्यापासून अर्थार्जन करणे कसे सोपे आहे, सहजशक्य आहे आणि या संधीचा योग्य वापर कसा करावा हे शिकविताना मला खुप मजा आली.
प्रत्येकाने स्वतः व्हीडीओ बनविण्याचे प्रात्यक्षिक केले. कॅमेरा, माईक, व्हीडीओ बनविणे व एडीट करणे, अ‍ॅनिमेशन व्हीडीओ बनविणे , स्क्रीनकास्ट व्हीडीओ असे अनेक प्रकार प्रत्येकाला शिकायला मिळाले आणि सर्वजण युट्युबच्या रंजक दुनियेत आत्मविश्वासाने पाउल टाकायला सज्ज होऊनच बाहेर पडले.
आपल्या मातृभाषेतून जास्तीत जास्त तांत्रिक शिक्षण देण्याच्या नेटभेटच्या मोठ्या स्वप्नामध्ये एक वीट कालच्या प्रशिक्षणाच्या रुपाने जोडली गेली !
सर्व प्रशिक्षणार्थींचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !!
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

नेटभेटची "युट्युब मास्टरक्लास" कार्यशाळा नेटभेटची "युट्युब मास्टरक्लास" कार्यशाळा Reviewed by Salil Chaudhary on 06:45 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.