ही छोटीशी टिप वापरून निसर्गाचे संरक्षण करायला हातभार लावा !


मित्रांनो, आज आपण अत्यानूधिक युगात वावरत आहोत्.अनेक सुखसोयी,तंत्राज्ञान,वेगवेगळी यांत्रिक साधने.....इत्यादींचा वापर करत आहोत. परंतु आपण जितक्या जास्त सुखसोयींसाठी कॄत्रिम जीवनपद्धती वापरत आहोत,तितक्याच प्रमाणात आपण निसर्गापासुन दुर जात आहोत.पुष्कळ जीवनोपयोगी वस्तूंच्या निर्मीतीसाठी आपण निसर्गाला हानी पोहचवत आहोत्.त्यापैकी एक म्हणजे लाकडापासुन होणारी कागदनिर्मिती.बर्‍याच वेळा तयार होणारा कागद पुष्कळ महत्त्वाच्या जागी वापरला जातो.परंतु तितक्याच प्रमाणात त्याचा दुरुपयोगही होतो.

उदा.सर्वांच्या अनुभवातली ATM transaction slip.

आपल्यापैकी बरेच जण ATMमध्ये जाऊन पैसे काढतात्.तेव्हा आपल्याला एक पर्याय विचारला जातो..Do you want a recepit for this transaction.

पुष्कळजण हा पर्याय स्वीकारतात.आणि नंतर जवळ्जवळ ८०/९०% लोक ही स्लिप ATM रूममध्ये असलेल्या कचर्‍याच्या डब्यात टाकुन निघुन जातात्.काहीजण तर पर्याय स्वीकारतात आणि नंतर स्लीपची वाटही न बघता निघुन जातात.तर काहीजण स्लिप काढल्यावर न बघता ती फेकुन देतात.

मित्रांनो पाहिले तर फक्त ही एक transaction slip आहे.परंतु प्रत्येकाने स्लीप नको असतानाही काढली आणि फेकुन दीली तर तो केवळ एक कागदाचा तुकडा कचर्‍याच्या डब्यात टाकत नसुन त्यासाठी कापलेली झाडे...म्हणजेच निसर्गहानी करत आहे.आपल्या निसर्गाचे रक्षण आपल्यालाच करायचे आहे.जर आपण लहानलहान क्षुल्लक गोष्टींतुन बचत केली तर त्याचे फार चांगले परिणाम दिसुन येतील्.

त्यासाठी फक्त एवढेच करा की जेव्हा तुम्हाला Do you want a recepit for this transaction हा पर्याय विचारण्यात येईल तेव्हा हे No बटन दाबा आणि अप्रत्यक्षरित्या निसर्गाचे संरक्षण करा.

टीम नेटभेट
www.netbhet.com
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

ही छोटीशी टिप वापरून निसर्गाचे संरक्षण करायला हातभार लावा ! ही छोटीशी टिप वापरून निसर्गाचे संरक्षण करायला हातभार लावा ! Reviewed by Salil Chaudhary on 00:55 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.