ब्लॉगचा वापर करुन आपल्या  उत्पादनाची विक्री कशी वाढवावी ? 


तुम्हाला तुमचा Blog सुरु करायचा आहे का? किंवा तुम्ही तो सुरु केला आहे परंतु त्याच्या सहाय्याने तुम्हाला तुमचे sales वाढवायचा ते माहित आहे का? नसेल तर मग खालील काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

BLOG

एक चांगला Blog लिहिणे म्हणजे काय?


एक चांगला Blog हा एक उत्तम marketing tool आहे.शिवाय तो तुम्हाला तुमच्या ग्राहकांपर्यंत सरळ पोहचविण्यास मदत करतो.

तुम्हांला तुमच्या ग्राहकांपर्यंत खालील गोष्टी तुमच्या Blog मार्फत पोहचविणे आवश्यक आहे.

1.Educate them- ग्राहकांना ज्ञान व महिती द्या.

2.Empowers them- ग्राहकांना योग्य पर्याय निवडण्यासाठी सक्षम बनवा.

3.Delights them- ग्राहकांना आपल्या उत्पादन व सेवेबद्दल उच्चतम अनुभव द्या.


Blogमुळे ग्राहकांना तुमच्या उत्पादनांविषयी माहीती मिळते.त्यांना तुमच्या उत्पादनांविषयी विश्वास वाटतो आणि त्यामुळे तुमचा उद्योग्/व्यवसाय वाढण्यास मदत होते.तुमचे blogging धोरण व्यवस्थित असेल तर ग्राहक तुमच्या Blog पर्यंत आपोआपच खेचले जातील्.आणि वाचकांचे रुपांतरण हळूहळू ग्राहकात होईल.

मग नक्की काय लिहिले पाहीजे? कशी सुरुवात करायची? हे प्रश्न तुम्हाला नक्किच पडतील्. त्यावेळी आपण स्वतः एक ग्राहक आहे असे समजा आणि त्यावर थोडासा विचार करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या ग्राहकांना नक्की काय हवे आहे हे शोधता येईल्. एकदा का तुम्ही ते शोधण्यास समर्थ झालात की लगेच तुमच्या Blog मार्फत ग्राहकांना तुमच्या उत्पादनांविषयी माहीती द्या आणि त्यांच्या काही शंका असल्यास त्यांचे निरसन करा.


तुम्ही Blogचा वापर खालील गोष्टींसाठीही करु शकता.


१.Blog वर तुमच्या व्यवसायाबद्दल लिहिणे.

२.Blog वर ग्राहकांना तुमच्या उत्पादनांविषयी माहिती देणे.

३.Blog वर तुमचे अनूभव सांगणे.

४.Blog वर ग्राहकांना updates कळविणे.

५. योग्य उत्पादन निवडण्यासाठी ग्राहकाला मदत करणे

तुम्हाला Blog लिहिण्यासाठी पुष्कळ tools चा वापर करता येतो.जसे कि wordpress,blogger आणि medium.तुम्ही तुमचे स्वतःचे एखादेdomain निवडा आणि सुरुवात करा. तुम्हाला Blog लिहिण्याचा विषय मिळाला की Google search engine वापरून चांगल्यात चांगल्या keywordsचा वापर करा.त्यासाठी Goole keyword Planner चा वापर करा.

तुम्ही जे काही पोस्ट लिहिणार असाल ते जास्तीत जास्त ६०० शब्दांपर्यंत मर्यादीत ठेवा.सुरुवात आणि शेवट योग्य असु द्या. प्रत्येक ब्लॉग पोस्ट मध्ये एक तरी चांगले चित्र असु द्या. आणिमग तुमची पोस्ट तुमच्या ग्राहकांना शोधता येईल. ह्यालाच SEO(Search engine optimization) म्हणतात.

मग हे SEO व्यवसायवृद्धीसाठी का आवश्यक आहे?


SEO मुळे ग्राहक तुमच्या पोस्टपर्यंत सहजरित्या पोहचू शकतात्.तुमचे लिहिणे योग्य आणि मर्यादीत असेल तर ग्राहक तुमच्या पोस्टस वाचण्यात रस घेतील.आणि तुमचे कायमस्वरूपी वाचक/ग्राहक बनतील.

खालील काही गोष्टीतुमच्या Blogच्या लोकप्रियतेसाठी अवश्य करा.

१.तुमचा विषय,उत्पादन लोकापर्यंत थेट पोहचविणे.

२.तुम्ही ग्राहकांना जे द्यायचे कबूल केले आहे तेच त्यांना द्या.उलट्सुलट किंवा खोट्या जाहीराती देऊ नका.

३.तुमच्या Blogशी उपयुक्त काही लिंक्स असतील तर त्या लोकांपर्यंत पोहचवा.

४.चांगल्यात चांगल्या गुगल कीवर्ड टूल्चा वापर करा.

५.काही वेळेस ग्राहकांना return offer द्या जसे... freebie,a webinar,an Ebook, किंवा तुमच्या Blogसाठी subscription...वैगेरे

प्रत्येक पानावर तुमचं domain नामांकित करा.त्यामुळे ते सहज शोधण्यास सोपे होते. जितक्या जास्त पोस्ट तुम्ही लिहू शकाल तितकाच तुमचा Blog प्रसिद्ध होईल्. जर तुम्ही तुमच्या वाचकांच्या मागण्या योग्य वेळी पुरविण्यास समर्थ व्हाल तेव्हा तुमचे वाचक तुमचे ग्राहक बनतील आणि तुमच्या Blog शी जास्तीत जास्त जोडले जातील्. तुमचा प्रत्येक वाचक तुमचा ग्राहक असेल असे नाही परंतु ऑनलाईन येणारा जवळपास प्रत्येक ग्राहक तुमचा वाचक असेलच ! एक चांगला Blog लिहिल्यामुळे एका वाचकाचे चांगल्या ग्राहकात तुम्ही रुपांतर करुन आपला व्यवसाय वाढवू शकता.त्यासाठी वरील मुद्दे लक्षात घ्या आणि आजच तुमचा Blog लिहिण्यास सुरूवात करा.

नेटभेटच्या सोशल मिडीया मार्केटिंग मास्टरक्लास या मराठी प्रशिक्षणामध्ये व्यवसाय वाढीसाठी ब्लॉगलेखन, सर्च ईंजिन ऑप्टीमायझेशन, गुगल कीवर्ड टूलचा योग्य वापर, आपली ब्लॉग पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे अनेक उपाय शिकविले जातात. जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना डिजीटल तंत्रज्ञानाचा उपयोग करुन व्यवसाय वाढविता आला पाहिजे या उद्देशाने आम्ही हे काम करीत आहोत.


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा - http://www.netbhet.com/social-media-marketing-marathi.html किंवा आम्हाला 9819128167 या क्रमांकावर फोन/ व्हॉट्सअ‍ॅप करा.धन्यवाद,

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

WWW.NETBHET.COMGet NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

ब्लॉगचा वापर करुन आपल्या  उत्पादनाची विक्री कशी वाढवावी ?  ब्लॉगचा वापर करुन आपल्या  उत्पादनाची विक्री कशी वाढवावी ?  Reviewed by Salil Chaudhary on 03:19 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.