Marathi Businessman Shri Ashok Khade मराठी उद्योजक श्री. अशोक खाडे


सोशल मिडीया किती पॉवरफुल आहे याचा मला नुकताच प्रत्यय आला. नेटभेटच्या फेसबुक पेजवर मी दोन आठवड्यांपूर्वी एक व्हिडीओ प्रकाशित केला होता. हा प्रेरणादायी व्हिडीओ प्रथितयश मराठी उद्योजक श्री. अशोक खाडे यांच्याबद्दल होता.


हा व्हिडीओ अनेकाना आवडला आणि व्हायरल झाला. whatsapp च्या माध्यमातून तो चक्क श्री. अशोक खाडे यांच्यापर्यंत पोहोचला. आणि केवळ एकदाच नव्हे तर त्यांच्या अनेक मित्रांनी हा व्हीडीओ त्यांना whatsapp मध्ये पाठवला.
श्री. अशोक खाडे यांना देखील हा व्हिडीओ आवडला आणि त्यांनी माझ्याशी स्वत: संपर्क साधून व्हिडीओ आवडल्याचे सांगितले. तसेच मला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
काल मला सरांच्या ऑफीसमध्ये ही ग्रेटभेट घेण्याची संधी मिळाली. खाडे सरांसोबत तब्बल दोन तास गप्पा मारण्याचे भाग्य मला लाभले. एक माणूस आयुष्यात किती वेगवेगळ्या गोष्टी साध्य करू शकतो याचे ते एक ज्वलंत उदाहरण आहेत.
अत्यंत साधे , प्रेमळ व्यक्तीमत्व आणि तेवढेच करारी , द्रष्टे बिझनेसमन ही त्यांची दोन्ही रूपं मला जवळून पाहता आली.
अशोक सरांशी म्हणजेच आबांशी गप्पा मारताना त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली जी मला व्हिडीओ मध्ये मांडायला आवडली असती. ती माहिती आणि नवीन मिळालेले फोटो घेऊन मी हा व्हिडीओ पुन्हा नव्याने बनवणार आहे. लवकरच नेटभेटच्या वाचकांना हा व्हिडीओ पाहता येईल.
=================================================================
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Marathi Businessman Shri Ashok Khade मराठी उद्योजक श्री. अशोक खाडे Marathi Businessman Shri Ashok Khade  मराठी उद्योजक श्री. अशोक खाडे Reviewed by Salil Chaudhary on 08:17 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.