महेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे ?


MS Dhoni Leadership story महेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे ?

१. खालील फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी चषक स्वीकारताना दिसत आहे -


२. चषक स्वत:कडे न ठेवता त्याने तो संघातील तरुण खेळाडूंकडे सुपूर्द केला -


३. तरुण खेळाडूंना चषकासोबत फोटो काढायची संधी देऊन धोनी स्वत: मागे गेला.४. त्यानंतर सपोर्ट स्टाफला देखील फोटो काढण्यासाठी पुढे आणलं आणि स्वत: मागे जाऊन उभा राहिला.


५. आणि त्या नंतर दुसऱ्या एका सामन्यात जेव्हा संघ हरला तेव्हा मात्र धोनी पराजयाची पूर्ण जबाबदारी घेऊन पुढे उभा राहिला.


मित्रांनो, म्हणूनच धोनी एक यशस्वी आणि आदर्श नेता आहे.

ऑफीसमध्ये कितीतरी लोक आपल्याला क्रेडीट मिळावं म्हणून धडपड करत असतात आणि एखादी चूक झाली तर ती आपल्या सहकार्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसं कधीच यशस्वी होत नाहीत....होऊ शकत नाहीत.

जेव्हा क्रेडीट कोणाला मिळतंय याची चिंता न करता काम केलं जातं तेव्हा आपोआप संघ तयार होतो....संघभावना तयार होते.

महेंद्रसिंग धोनीने हे त्याच्या वागण्यातून आपल्याला नक्कीच शिकवलं आहे !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
 www.netbhet.com / Learn.netbhet.com
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

महेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे ? महेंद्रसिंग धोनी एक उत्कृष्ट लीडर (leader) का आहे ? Reviewed by Salil Chaudhary on 01:55 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.