प्रेम गणपती - रोमांचक प्रेरणादायी कहाणी !


प्रेम गणपती - १५० रुपये महिना पगारावर सुरुवात करुन आज ३० करोडची उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक बनणाऱ्या प्रेम गणपतीची ही रोमांचक प्रेरणादायी कहाणी !

#BeLikePremGanpathy
 • १७ वर्षांचा असताना तामिळनाडूच्या तुतिकोरीन गावातुन तो घरी न सांगता
  १९९० साली मुंबईला निघुन आला
 • त्याच्या एका ओळखिच्या माणसाने नोकरीच्या आमिषाने त्याला आणले होते.
  पण प्रेम गणपतीचे पैसे घेऊन तो माणूस लंपास झाला
 • काहीच माहिती नसलेला, हिंदीही बोलता येत नसलेला प्रेम मुंबईत एकटाच पडला. परतीचे पैसे नसल्याने तो मार्गही बंद झाला
 • माहिममधील एका बेकरी मध्ये १५० रुपये महिना पगारावर त्याला भांडी विसळण्याचे काम मिळाले
 • त्यानंतर प्रेम ने हॉटेल मध्ये आणि चेंबूर मध्ये पिझ्झा डीलिव्हरीचे काम देखिल केले
 • दोन वर्षे पैसे जमवून प्रेम गणपतीने नवी मुंबईमधील वाशी येथे १९९२ साली इडली आणि डोसाची गाडी सुरु केली
 • जवळच्याच मॅकडोनाल्ड्सची प्रगती पाहून प्रेम गणपतीला आपलेही एक दुकान असावे असे वाटू लागले. काही वर्षांतच पैसे साठवून त्याने भाड्याने एक दुकान घेतलेही.
 •  प्रेमचे खाद्यपदार्थांचे दुकान चांगले चालु होते. तिथे आसपासच्या ऑफिस आणि कॉलेज मधील अनेक लोक खायला येत असत
 • त्यापैकीच कॉलेजमधील काही मुलांकडून प्रेमला इंटरनेटची ओळख झाली. इंटरनेट वर पाहून प्रेमने सेजवान डोसा, पनीर चिली डोसा असे २६ नवनविन प्रकार सुरु केले.
 • हा प्रयोग लोकांना फारच आवडला आणि प्रेम गणपतीच्या दुकानासमोरची गर्दी देखिल वाढू लागली.
 • या दुकानावर खाण्यासाठी येणार्‍या काही लोकांनी प्रेमला जवळच सुरु होणार्‍या मॉलमध्ये डोसाचे दुकान सुरु करण्याचा सल्ला दिला. आणि प्रेमने पहिले "डोसा प्लाझा" हे मॉलमधील दुकान सुरु केले.
 • पुढे प्रेमने डोसा प्लाझाच्या फ्रँचाईजी द्यायला सुरुवात केली. आजपर्यंत "डोसा प्लाझा"ची भारतात ४५ आणि मस्कत, ओमान , न्युझीलँड येथे सात दुकाने आहेत.
 • प्रेम गणपतीच्या मेहनत, चिकाटी आणि हुशारीला नेटभेटचा सलाम. 

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com

=====================================================
आता नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर देखील उपलब्ध आहे. यासाठी 9819128167 या क्रमांकावर SUBSCRIBE ME TO NETBHET BROADCAST असे Whatsapp मध्ये लिहून पाठवा. सोबत आपले नाव, इमेल पत्ता आणि शहर ही माहिती देखील पाठवा. =====================================================
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

प्रेम गणपती - रोमांचक प्रेरणादायी कहाणी ! प्रेम गणपती - रोमांचक प्रेरणादायी कहाणी ! Reviewed by Salil Chaudhary on 03:08 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.