उद्योगजकते बद्दलचे गैरसमज

Enterpreneurship myth-उद्योगजकते बद्दलचे गैरसमज

मित्रांनो,आज या video मध्ये आपण जाणुन घेणार आहोत Enterpreneurship myth-उद्योगजकते बद्दलचे गैरसमज.उद्योगजकते बद्दल आपल्या समाजामध्ये,आपल्या मनामध्ये काही गैरसमज पसरलेले आहेत....ते कय आहेत आणि ते कसे चुकीचे आहेत ते आपण बघुया.

१. You are born an Entrepreneur

म्हणजेच उद्योजक हा जन्माला यावा लागतो, तो जन्मापासूनच उद्योजक असतो. परंतु मित्रांनो ते माझ्यामते साफ खोटं आहे. बरीच अशी मला तुम्हाला उदाहरणे देता येतील, ज्यांना वयाच्या ३०, ४० किंवा ५० व्य वर्षापर्यंत उद्योजकतेचा गंध ही माहित नव्हता. कधीतरी आयुष्यात एखादी कल्पना सुचली आणि मग त्या कल्पनेवर काम करून मग ते उद्योजक बनले. असं मुळीच नाहीये कि अगदी शाळेत असतानाच माणूस तयारी करतो की, मला उद्योजकच व्हायचं आहे. हिंदी चित्रपटात तास चालत पण प्रत्यक्षात मात्र कधी तसं होत नाही. खरंतर बरेच उद्योजक तुम्ही पहिले असतील जे आपल्या भाषणामध्ये, इंटरव्युव्ह, आपल्या आत्मचरित्रामध्ये आपल्या बालपणाचे किस्से सांगतात, त्यानंतर त्यापासून आपण पुढे कसं डेव्हलप होत गेलो ते सांगतात. त्यावरून तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे की लहानपणापासूनच ही व्यक्ती हुशार होती आणि लहानपानापासूनच त्यांच्यात उद्योजकतेची कौशल्य होती. परंतु मित्रांनो , हे सगळे काँनेक्टिव्हिटी डॉट्स असतात, जेव्हा एखादा यशस्वी माणूस आपल्या जुन्या आठवणी, आपल्या भूतकाळाकडे बघतो तेव्हा त्याला असे काही डॉट्स दिसतात की ते जोडून ती ही स्टोरी बनवतो. आणि मीडियाला अशाच गोष्टी जास्त आवडतात, आणि त्या अगदी तश्याच छापल्या देखील जातात. आणि त्या लोकप्रिय देखील होतात. म्हणूनच कदाचित तो गैरसमज पसरलेला आहे. परंतु मुळात तसं काहीच नाही. त्यांचं बालपणही आपल्यासारखच असत. आता आपण ही मागे वळून पाहिलं आणि त्याच अवलोकन केलं तर आपल्या भूतकाळामध्ये अशा काही गोष्टी झाल्या असतील किंवा अशा काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या असतील. त्या जर तुम्ही पाहिल्यात आणि त्यातून काही शिकलात तर ते तुम्हाला उद्योजकतेकडे किंवा जीवनात यशस्वी होण्याकडे प्रेरित करणाऱ्याच असतील.

२. Entrepreneur should be talented :

दुसरा गैरसमज जो आहे की एन्त्रेप्रेनेर हा टॅलेंटेड किंवा हुशार असावा. परंतु जर तसं असत तर लहानपणी शाळेत असताना  किंवा कॉलेजमध्ये  असताना  तुमच्या  वर्गात  जो कोणी पहिला येणार मुलगा किंवा मुलगीच आज सगळ्यात मोठे उद्योजक झाले असते. परंतु तसे नाहीये. तर उद्योजकाने स्मार्ट असणे गरजेचे आहे. स्मार्ट आणि टॅलेंटेड मध्ये फरक आहे. उद्योजकाला कळलं पाहिजे की, आपल्याला नक्की कुठल्या स्मार्ट माणसांकडून किंवा इंटेलिजन्ट माणसांकडून काम करून घेता आले पाहिजे. खरा उद्योजक हा महेंद्रसिंह धोनी सारखा असतो. जो भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान आहे. त्याच्याकडे सचिन तेंडुलकर सारखा बॅट्समन आहे आणि त्याच्याकडे झहीर खान सारखा बॉलर  देखील आहे. ते सगळे आपापल्या खेळामध्ये , कौशल्यामध्ये पारंगत किंवा एक्स्पर्ट आहेत. परंतु त्यांच्या कडून योग्य काम कसं करून घ्यायचं हे कप्तानच काम असतं. उद्योजकच पण तसंच असतं.
फायनान्स, सेल्स, आणि मार्केटिंगमध्ये हुशार माणसे खूप आहेत, त्यांना एकत्र आणून त्यांच्याकडून काम करून घेणं हे महत्वाचं काम आहे. एखाद्या ऑर्केस्ट्रा चा ट्रेनर किंवा कंडक्टर असतो , त्याच काम जे आहे अगदी तेच काम एन्त्रेप्रेनेरच असतं. त्यामुळे एन्त्रेप्रेनेर स्वतः टॅलेंटेड किंवा हुशार असणे गरजेचे नाही, परंतु स्मार्ट असणे गरजेचे आहे. त्याला कळलं पाहिजे की कोणत्या व्यक्तीकडून कसं काम करून घेता येईल.


३. Entrepreneur should have money :

तिसरा गैरसमज जो आपल्याला उद्योजकते बद्दल ऐकायला मिळतो तो म्हणजे तुमच्याकडे खूप पैसा म्हणजे इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तरच बिझनेस होतो. परंतु असे खूप एन्त्रेप्रेनेर आहेत त्यांनी हे सिद्ध केलं आहे की कुठल्याही इन्वेस्टमेंटशिवाय , स्वतः कडे जास्त पैसे नसताना, आणि कुठलीही आर्थिक ताकद पाठीशी उभी नसताना देखील एखादी चांगली कल्पना चांगल्याप्रकारे राबवली किंवा सत्यात उतरवली तर बिझनेस मोठा होतो. आणि मग त्यात इन्व्हेस्ट करणारे देखील सापडतात.
आता सॅम वॉल्टनच उदाहरण घेऊयात. वॉलमार्ट हि जगातील सर्वात मोठी रिटेल सेल्स चालू केली. तेव्हा त्या सॅम वॉल्टन कडे रिटायरमेंटला सापडलेले तेवढेच पैसे होते. त्यांनी ते त्यांच्या उतार वयात केलं तेव्हा त्यांची रेटायर्मेंट झाली होती. वॉल्टन यांनी या वयात आणि ते हि कमी पैशात एवढी मोठी चैन उभारली. जर भारतामधलं उदाहरण घ्यायचं झालं तर फ्लिपकार्ट. फ्लिपकार्टने केवळ ४ ते ५ लाख त्यांच्याकडे सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट होती आणि त्यातून त्यांनी बिझनेस उभा केला. आणि आज बघा फ्लिपकार्ट कुठे पोचली आहे. उद्योगासाठी पैसा असणे किंवा उद्योग सुरु करण्याआधी पैसा असणे हे चुकीचे आहे, हा केवळ एक गैरसमज आहे. उद्योगासाठी पैसा लागतो पण तो उद्योग वाढवण्यासाठी लागतो. आणि ते मिळवण्याचे खूप सारे प्रकार किंवा मार्ग उपलब्ध आहेत. असं नाही की, आज ज्याच्याकडे पैसा आहे तोच फक्त एन्त्रेप्रेनर किंवा बिझनेसमॅन बनू शकतो.

तर मित्रानो हे गैरसमज जर तुमच्या मनात असतील तर ते काढून टाका. उद्योजकता हि कोणाचीही बांधिलकी नाही. एक चांगली कल्पना , त्याच्यावर काम करण्याची जिद्द आणि हिम्मत आणि कधीही न कंटाळता न घाबरता , मागे न पडता सतत त्याच गोष्टीचा पाठपुरावा केलात तर तुम्ही देखील एन्त्रेप्रेनर बनू शकता आणि जरूर बना.

ऑल द बेस्ट. धन्यवाद !

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

उद्योगजकते बद्दलचे गैरसमज उद्योगजकते बद्दलचे गैरसमज Reviewed by varsha on 04:45 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.