उद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा?


उद्योजक म्हणजे Enterpernuer कसा विचार करतात आणि NonEnterpernuer म्हणजे उद्योग न करणारे कसा विचार करतात या दोघांमधे मुलभूत फरक आहे.मग यशस्वी उद्योजक Enterpernuer होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहीजे ते आपण पाहू.

*गोष्टी करून शिका:*
साधारणतः आपल्याला जेव्हा एखादं काम करायचं असतं तेव्हा आपण त्याबद्दल माहिती गोळा करतो किंवा त्याबद्दल ज्ञान मिळवतो. पण उद्योजक मात्र तसं करत नाही ते एखादी गोष्ट आधी करून बघतात, त्यातून शिकतात आणि मग पुढे जातात.

*परिणामांवर लक्ष केंद्रित करणे :*
आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे उद्योजक एखाद्या गोष्टीवर फोकस करतात आणि तिथपर्यंत फोकस करतात जिथपर्यंत त्यातून काही रिजल्ट मिळत नाही. उद्योजकांना पगार मिळत नसतो. पगार म्हणजे आपण जे काही महिनाभर काम करतो त्याचा आपल्याला मोबदला किंवा पगार मिळत असतो. आपल्या जे काही प्रयत्न करतो त्यावर पगार मिळतो, अंतिम रिजल्टवर पगार मिळत नाही. उद्योजकांचा मात्र तसं नसत. जोपर्यंत अंतिम रिजल्ट मिळवत नाही, साध्य करत नाही तो पर्यंत त्यांचा पगार मिळत नसतो. हा एक मुख्य फरक आहे. आणि हा एक रिव्हर्स माईंडसेट आहे. 

*गोष्टी पूर्ण करा:*
उद्योजक इतरांकडून काम करून घेतात. तुम्हाला लक्षात असेल की शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना, आपल्याला सर्व काम स्वता:हून कसं करायचं किंवा स्वतःहून काम केलेलं किती चांगलं असतं यावर भर दिला जायचा, परंतु हे मूळतः खूप विरुद्ध आहे. उद्योजकाला स्वतःहून काम न करता इतरांकडून करून चांगल्या पद्धतीने करून घेता आले पाहिजे. त्यासाठी त्यांना पब्लिक सोबत चांगले रिलेशनशिप बनावता आली पाहिजे.

*रिस्क/ धोका घ्या :*
उद्योजक नेहमीच रिस्क घेण्यात माहीर असतात, हे नेहमीच रिस्क घेण्यासाठी तयार असतात. ते रिस्क घेतात आणि रिस्क घेणं म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखं नसतं. जेव्हा ते रिस्क घेतात त्यावेळी ती कॅलक्युलेट करून घेतलेली रिस्क असते, त्यांना माहित असते की ते काय करत आहेत आणि ते का करत आहेत. त्यासाठी व्हिजन अतिशय महत्वाचे आहे. आणि त्याला जोडूनच एक भाग आहे आणि तो म्हणजे व्हिजन.

*व्हिजन :*
उद्योजकाला एक व्हिजन असतं. व्हिजन म्हणजे काय तर लांब किंवा दूर पाहण्याची दृष्टी. जो रिजल्ट येणार आहे किंवा जे साध्य करायचे आहे, ते उद्योजकाच्या डोक्यात आधीच असते. जस एखादा शिल्पकार दगडामध्ये मूर्ती कोरत असताना त्या दगडामध्ये मूर्ती फक्त त्यालाच दिसत असते. आणि उरलेला भाग तो काढून टाकत असतो. त्यावेळी ती मूर्ती इतरांना सोडून फक्त त्या शिल्पकारालाच दिसत असते. उद्योजकाच पण तसच आहे, त्याला ते व्हिजन दिसत असते. जे इतरांनी तिकडे पाहिलं तरी त्यांना दिसत नाही. मी जे साध्य करणार आहे किंवा जे काही मिळवणार आहे ते त्याचं स्वप्न आणि ध्येय असतं. आणि ते त्याच्या नजरेसमोर स्पष्ट असते, इतरांना ते नसतं. आणि ते व्हिजन लक्षात ठेवून जे मार्गक्रमण करत असतात तेच खरे उद्योजक असतात. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या सर्व बाबी आपल्याला शिकता येतात, आपल्या स्वभावामध्ये बदल आणता येतात आणि त्यामुळे कोणीही उद्योजक बनू शकतो.

जर आता मी सांगितलेल्या या काही गोष्टी ध्यानात ठेवून त्यानुसार मार्गक्रमण केला किंवा त्यानुसार विचार पद्धतीमध्ये, आपल्या माईंडसेट आणि आपल्या स्वभावामध्ये बदल केला तर नक्कीच कोणीही उद्योजक बानू शकतो.
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

उद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा? उद्योजकांप्रमाणे कसा विचार करावा? Reviewed by varsha on 02:27 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.