Enterpreneur,Bussinessmanआणि Freelancer यामधील फरक..

Enterpreneur म्हणजे नक्की काय?Enterpreneur,Bussinessmanआणि Freelancer यामधील फरक..

खरं तर Enterpreneur हा शब्द बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वापरला जातो. काही लोकांच्या मते जो बिझनेसमॅन/Bussinessman आहे, ज्यांनी बिझनेस सुरु केला आहे किंवा काही लोकांच्या मते कोणी नवीन सुरु केला आहे किंवा नवीन इनोव्हेशन म्हणजे शोध केलेले आहे मग त्याच रूपांतर बिझनेसमध्ये केलं आहे, तो Enterpreneur आहे.
परंतु Enterpreneur ची कोणती व्याख्या म्हणजे डेफिनेशन असावी यावर मोठे वादविवाद आहेत. त्यामुळे अजूनही सर्वमान्य अशी वाख्या अजून बनली नाही. परंतु मला पटलेली एक व्याख्या आहे आणि ती म्हणजे "हार्वर्ड बिझनेस स्कूल" ची Entrepreneurship is the persuit of opportunity without regard to रिसोर्सेस. यातले दोन शब्द महत्वाचे आहेत, persuit of opportunity  आणि without regard to resources. Enterpreneur म्हणजे अशी व्यक्ती जी कुठल्याही अपॉर्च्युनिटी / opportunity म्हणजेच संधीच्या शोधात असते, त्याचा सतत पाठपुरावा करते. नेहमी संधी शोधून काढते आणि ती पूर्ण करते without regard to resources  म्हणजे त्याच्याकडे मॅनपॉवर, संपत्ती, इन्व्हेस्टमेंट किंवा अनुभव नसेल तरीही परंतु एखादी कल्पना , संधी शोधल्यानंतर त्याच्यावर ते तोपर्यंत काम करतात जोपर्यंत ते यशस्वी होत नाही. आणि त्या संधीला वास्तवात उतरवत नाही तोपर्यंत जे काम करता आणि काही रिसोर्सेस म्हणजे साधनं नसतानाही तरीही ते काम करून आपलं ध्येय प्राप्त करतात त्यांना Enterpreneur म्हणतात.
उदाहरणार्थ, कामथ ग्रुप ऑफ हॉटेल चे विठ्ठल कामत. विठ्ठल कामत यांच्या वडिलांचे मुंबईमध्ये एक हॉटेल होते. तर विठ्ठल कामत यांनी जर तेच हॉटेल पुढे चळवळ असत तर ते Enterpreneur नसते तर ते एक बिझनेसमॅन असते. कारण त्यांनी चालू असलेला बिझनेस नवीन सुरु केला., त्यांनी कोणतीही नवीन संधी पहिली नाही, रिसोर्सेस आधीच त्यांच्याकडे होते. परंतु विठ्ठल कामत यांनी तसं न करता स्वतः च छोटंसं हॉटेल असून सुद्धा फाईव्ह स्टार इकोफ्रेंडली हॉटेल बनवायचं स्वप्न पाहिलं आणि कुठल्याही प्रकारचे रिसोर्सस नसताना त्याकाळी स्वतःकडे इतकी इनव्हेसमेंट म्हणजे गुंवणूक नसताना देखील त्यांनी ते स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाचा पाठलाग केला आणि ते शेवटी पूर्ण केलं, म्हणून विठ्ठल कामत ते Enterpreneur आहेत. अशाप्रकारे आपण बिझनेसमॅन आणि Enterpreneur यांच्यातील फरक बघितला. सर्व बिझनेसमॅन हे Enterpreneur असतीलच असे नाही, परंतु सर्व Enterpreneur हे बिझनेसमॅन असतात.

आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे फ्रीलान्सर जे सर्विस देतात ते Enterpreneur नसतात. फ्रीलान्सर/Freelancer म्हणजे कंसल्टंटकिंवा ट्रेनर असतात ते Enterpreneur नसतात कारण ते त्यांचा वेळ देऊन त्याचे पैसे घेतात. कंसल्टंट, ट्रेनर किंवा वेब डिझाइनर यांचा वेळ ते वेगवेगळ्या कंपनीशी करार करून त्यांना काम देतात, परंतु एकच सर्विस ते परत परत विकत असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचं ऍक्टिव्ह इनकम असते म्हणजे ते स्वतः त्यात काम करत नाही तोपर्यंत त्यांना पैसे मिळत नाही. त्यामुळे फ्रीलान्सर/ Freelancer हा एक नोकरीचाच एक प्रकार आहे फक्त त्यांच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी आहे. नोकरीमध्ये आपण इतरांना सर्विसेस विकतात. Freelancer मध्ये त्याला जेव्हावाटते तेव्हा तो इतरांना सर्विस देतो. अशाप्रकारे नोकरी आणि फ्रीलान्सर/Freelancer  मधला हा फरक आहे. त्यामुळे हा Enterpreneur आणि फ्रीलान्सर/Freelancer  या दोनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

मला खात्री आहे कीEnterpreneur म्हणजे नक्की काय हे तुम्हाला कळले असेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद !


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Enterpreneur,Bussinessmanआणि Freelancer यामधील फरक.. Enterpreneur,Bussinessmanआणि Freelancer यामधील फरक.. Reviewed by varsha on 03:40 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.