मी विवोचा फोन घेऊ की ओप्पो चा ?

मी ऑप्पो चा मोबाईल घेऊ की विवो चा ? हा प्रश्न मला बरेच जण विचारत असतात....त्या सर्वाना हे एकच उत्तर ! भारतातल्या कोणत्याही शहरातल्या कोणत्याही रस्त्यावर पहा, तुम्हाला ऑप्पो आणि विवो च्या जाहिराती दिसतील. टीव्ही वर क्रिकेट पहा, कबड्डी पहा किंवा फुटबॉल्...तुम्हाला ऑप्पो आणि विवो च्या जाहिराती दिसतील. ईतर कोणीही ब्रँड एवढ्या जाहिराती करत नसताना, हे दोनच मोबाईल ब्रँडस एवढ्या जाहिराती का करत आहेत याचा तुम्ही विचार केला आहे का ? मित्रांनो, या जाहिरातींचे पैसे खरंतर आपणच देतोय्..प्रत्येक वेळी आपण विवो किंवा ऑप्पो फोन घेतो तेव्हा ! उदाहरणार्थ ऑप्पोचा F3 PLUS आणि विवोचा V5 PLUS हे दोन प्रमुख फोन पाहूया ! या दोनही फोनची किंमत अनुक्रमे २८००० आणि २३००० आहे. पण तुम्ही याच स्पेसीफिकेशनचे इतर बजेट स्मार्टफोन पाहिले तर लक्षात येईल की त्यांची किंमत ११००० ते १६००० आहे या दोनही फोनमध्ये कॅमेरा जास्त मेगापिक्सेलचा आहे असे वाटेल...पण कोणीही एक्स्पर्ट सांगेल की फक्त जास्त मेगापिक्सेलमुळे कॅमेरा चांगला होत नसतो तेव्हा मित्रांनो, मला विचाराल तर हे दोन फोन घेऊ नका असंच मी सांगेन ! आणि हो एक गोष्ट सांगायची राहिलीच ! ऑप्पो आणि विवो या दोनही कंपन्या एकच आहे. त्यांची मालक कंपनी आहे चीनची BBK Electronics. काय आश्चर्य वाटलं ना ! अजून एक आश्चर्याचा धक्का देतो तुम्हाला ! आणखीन एक मोबाईल ब्रँड वन-प्लस हे देखिल या BBK Electronicsचेच बाळ आहे :-) माझ्यावर विश्वास नसेल तर "गुगल" काकांना विचारा !
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

मी विवोचा फोन घेऊ की ओप्पो चा ?  मी विवोचा फोन घेऊ की ओप्पो चा ? Reviewed by netbhet on 20:13 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.