कसं असणार आहे आपले भविष्य !

तंत्रज्ञान आपलं जीवन बदलवून टाकणार आहे. कसं असणार आहे आपले भविष्य !

१९९८ साली कोडॅक मध्ये १ लाख ७० हजार लोक काम करत होते आणि जगभरातील कॅमेरा रोल्स आणि फोटो पेपरच्या विक्री मध्ये ८५% वाटा कोडॅकचा होता. पण त्यानंतर काही वर्षांतच कोडॅकचं बिझनेस
मॉडेल अक्षरक्षः गायब झालं आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली. 

कोडॅक बरोबर जे झालं ते येत्या १० वर्षात अनेक उद्योगांबरोबर होणार आहे. आणि अजूनही बर्‍याच लोकांना त्याबाबत पुसटशी कल्पनाही नाही.
खरंच, १९९८ मध्ये किती लोकांना वाटलं असेल की येत्या पाच वर्षात आपण कधीच कँमेरा रोल विकत घेणार नाही. असं नाही की डीजीटल कॅमेरे अचानक अवतरलेत्....डीजीटल कॅमेर्‍याच्या तंत्रज्ञानाची सुरुवात
१९७५ मध्ये झाली होती. सुरुवातीच्या डीजीटल कॅमेर्‍याची क्षमता फक्त १०००० पिक्सेल्स होती. त्यामुळे जनमानसात त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता...परंतु तंत्रज्ञानात हळूहळू पण सतत सुधारणा
होत गेली आणि काही वर्षातच डीजीटल कॅमेरा ही ग्राहकांची पहिली पसंत ठरु लागली.

मित्रांनो अगदी असंच आगामी आर्टीफिशीयल इंटेलिजन्स (कृत्रीम बुद्धीमत्ता) , थ्रीडी प्रिंटींग, आधुनिक शेती तंत्र, स्वयंचलित गाड्या, सौर उर्जा, ऑनलाईन शिक्षण आणि नव्या प्रकारचे जॉब्स या अनेक क्षेत्रात होऊ
घातलंय. हीच आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

कसं असणार आहे आपले भविष्य ! कसं असणार आहे आपले भविष्य ! Reviewed by netbhet on 21:22 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.