लक्झोटिका | मराठी प्रेरणादायी व्हीडीओ

मित्रांनो दररोज आपण एक ग्राहक म्हणून दुकानांमध्ये, मोठमोठ्या मॉल्समध्ये खरेदी करत असताना अनेक ब्रॅण्ड्सची निवड करत असतो. अगदी साधा पांढरा शर्ट जरी विकत घ्यायचा असला तरी त्यामध्ये अनेक ब्रॅंड्समुळे आपण गोंधळून जातो किंवा त्याहीपेक्षा साधं उदाहरण म्हणजे मिनरल वॉटर . अगदी पाण्याचेही अनेक ब्रँड्स असतात, उत्पादन बहुतांशी सारखंच असलं तरी प्रत्येकाच्या किमती वेगवेगळ्या असतात. ग्राहकांना ही चॉईस सुखावणारी असते.
परंतु मित्रांनो बिझनेसच्या दृष्टीने बघितलंत  तर चॉईस हे एक मोहजाल आहे. बऱ्याचदा अनेक मोठ्या कंपन्या आपलेच अनेक ब्रँड्स market मध्ये उपलब्ध करून देतात. ग्राहकांना याबाबतीत माहितीही नसते आणि आपल्याला निवडीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत या भ्रमात ते असतात. आणि ग्राहकांना भ्रमात ठेवून अनेक कंपन्या भरपूर नफाही कमावतात.
मित्रांनो आज मी तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल सांगणार आहे. या कंपनीचं नाव बऱ्याच जणांना माहित नाही पण त्यांच्या जगप्रसिद्ध ब्रँड्सने सारं जग काबिज केलं आहे. चष्मे आणि गॉगल्स बनवणाऱ्या या कंपनीचं नाव आहे लक्झॉटीका.
चला तर बघूया लक्झॉटीकाने जगभरातील चष्म्याचा व्यवसाय कसा एकहाती ठेवला आहे ते पाहूया.Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

लक्झोटिका | मराठी प्रेरणादायी व्हीडीओ लक्झोटिका | मराठी प्रेरणादायी व्हीडीओ Reviewed by netbhet on 21:08 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.