मराठी बिझनेस केस स्टडी | टेनसेंट केस स्टडी

फेसबुकने सोशल मिडीयाचा पुरता कब्जा घेतलाय, फेसबुक.कॉम सोबतच व्हॉटस अँप आणि इंस्टाग्राम या दोन मोट्या सोशल प्लॅटफॉर्मवर नियंत्रण मिळविल्यानंतर तर मार्क झुकरबर्ग सोशल मिडीया साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट बनला आहे. मार्क झुकरबर्गच्या या सिंहासनाला धक्का लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्याला फारसे यश आले नाही. पण मित्रांनो एक अशी कंपनी आहे जी फेसबुकला मागे टाकू शकते. किंबहुना २०१७ साली एकदा मार्केट व्हॅल्यू मध्ये त्या कंपनीने फेसबुकला मागे टंकलेही होते. मिडीया पासून दूर राहणाऱ्या या कंपनीबद्दल तुम्ही कदाचित कधिकच ऐकलेही नसेल.हि होऊशकते मित्रांनो मी ज्या कंपनीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे टेनसेंट. काय नव्हतं ऐकलं ना या कंपनीचं नाव कधी? त्याला कारणही तसाच आहे. टेनसेंट हि कंपनी आणि तिचं उत्पादन सध्या फक्त एकाच देशात वापरली जात आहेत आणि तो देश आहे आपला शेजारचा "चीन ". विचार करा जी कंपनी फक्त एका देशात ऑपरेट करून एवढी मोठी होऊ शकते ती जर जगाच्या बाजारपेठेत उतरली तर किती अवाढ्य आणि किती अजस्त्र होऊ शकते ? टेनसेंट ही सध्या जगातील नववी मोठी कंपनी आहे आणि अँपल, गुगल, अमेझॉन आणि फेसबुक नंतरची पाचवी मोठी इंटरनेट कंपनी आहे. १९९८ साली सुरु झालेली ही कंपनी फक्त २० वर्षात एवढी मोठी कशी झाली याचा आढावा आपण आज या व्हिडीओ मध्ये घेणार आहोत.


Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

मराठी बिझनेस केस स्टडी | टेनसेंट केस स्टडी मराठी बिझनेस केस स्टडी | टेनसेंट केस स्टडी Reviewed by netbhet on 21:38 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.