आयुष्याची दिशा ठरवणारं Vision Statement कसं बनवायचं ?

नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वतःच एक Vision  Statement बनवलेलं आहे का ? आपल्या आयुष्यातही आपण कुठे जाणार? आपली दूरदृष्टी काय आहे? कुठे आपल्याला पोचायचे आहे ? हे तुम्ही एका सिंगल पेजवर लिहिलेलं आहे का? मित्रांनो Vision  Statement अतिशय उपयुक्त आहे कारण तुमच्या आयुष्यातले मोठे मोठे निर्णय घ्यायची जेव्हा वेळ येते त्यावेळी Vision  Statement  तुम्हाला दिपस्तंभ सारखं मार्गदर्शन करत. मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं सिंगल पेज Vision  Statement कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपलं सगळ्यांचंच एक Vision  Statement असतंच जे स्पष्ट नसेल, लिहिलेलं नसेल पण एक ढोबळ मानाने एक रफ आयडिया असते की, आपल्याला आयुष्यात कुठे पोचायचं आहे, काय मिळवायचं आहे.
Vision  Statement मध्ये सगळ्यात महत्वाचं कॉन्फयुजन काय असतं की आपण इतरांच्या व्हिजनलाच आपलं व्हिजन बनवतो. कोणी म्हणतो की मला १०० करोडची कंपनी बनवायची आहे तर आपण ते आपलं व्हिजन बनवतो.
किंवा सोशल मीडियावर उद्योजक सोबत मोठी गाडी दाखवतात तर आपल्यलाहि तेच वाटत की आपल्यालाही हेच बनायचं आहे. प्रत्येकाचं व्हिजन सारखं नसतं. व्हिजन बाबत बेस्ट गोष्ट हीच आहे की तुम्ही निर्णय घेऊ शकता , की तुमचं व्हिजन काय असाल पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं व्हिजन होत की माझा बांधवाना यातून मुक्त करायचं आहे. त्यांचं व्हिजन जर चांगला वकील बनायचं  किंवा खूप पैसे कमवायचं तर त्यांनी कमावले असते कारण ते खूप हुशारही होते. परंतु आज त्यांचं नाव इतक्या वर्षांनंतरही कोणाच्या लक्षात राहील नसतं. किती श्रीमंत माणसांची नावं आपल्या लक्षात आहेत. खूप कमी, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी. त्यामुळे प्रत्येकाचं वेगळं असतं. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, शिवाजी महाराज इ. च व्हिजन हे वेगवेगळं होत. त्यामुळे दुसऱ्याच्या व्हिजनला आपलं व्हिजन बनवायची चूक मात्र करू नका. तुमचं स्वतःच एक वेगळं व्हिजन असाल पाहिजे. तेव्हाच ते तुम्हाला काहीतरी वेगळं करण्यासाठी उत्तेजित करेल.

मित्रांनो मी तुम्हाला आज व्हिजनसाठी ३ प्रश्न सांगणार आहे. मी तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं देणार नाही, कारण मग माझं व्हिजन हे तुमचं व्हिजन होईल. आणि जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं नीट बनवलेत तर तुम्ही तुमचं Vision  Statement  चांगल्या प्रकारे बनवू शकता.

सर्वप्रथम अशा एका ठिकाणी जा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. तुमच्या रूममध्ये स्वतःला बंद करून घ्या. थोड्यावेळासाठी किंवा एकटेच फिरायला जा. तुमचा फोन, कॉम्पुटर, टीव्ही, म्युझिक बंद करा. काहीच करू नका फक्त शांतपणे १५ मिनिटे या प्रश्नांचा विचार करा. १५ मिनिटे पेजवर ही काही लिहू नका आणि फक्त विचार करा. आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात करा. तर आता आपण ते ३ प्रश्न बघुयात कोणते आहेत.
१. तुम्हाला काय बनायचं आहे?
२. तुम्हाला काय करायचं आहे ?
३. तुम्हाला काय मिळवायचं आहे ?

आणि या प्रश्नाची उत्तरं फक्त पुढच्या ५ वर्षाचा विचार करून द्या. कारण त्याच्या पुढचं आपल्याला दिसत नाही. जग किंवा तंत्रज्ञान इतकं बदलणार आहे की तुम्ही आता तो निर्णय घेऊ शकत नाही. पुढे काय होणार आहे. पण पुढच्या ५ वर्षाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. त्यामुळे फक्त ५ वर्षाचा Vision  Statement  बनवा.

आता मित्रांनो, हे ३ प्रश्न आपण आता बघुयात.
१. मला काय बनायचं आहे?
सर्वप्रथम जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता. तेव्हा तुमच्या बद्दल काय भावना त्यांच्या मनात अली पाहिजे किंवा तुमच्याबद्दल काय विचार मनात आले पाहिजेत हे लिहा. ते लोक तुमच्याशी बोलून परत जातात तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय छवी राहिली पाहिजे ते लिहा. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबा बरोबर तुमची बायको, नवरा किंवा आई-वडील किंवा मुलं त्यांच्यावर तुमचा काय आणि कसा प्रभाव राहिला पाहिजे ते लिहा. त्याचप्रमाणे तुमचे मित्र मंडळी, तुमचा समाज, तुमच्या आसपासची लोकं यांनी काय आणि कसा विचार केला पाहिजे ते तुम्ही लिहा. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला काय वाटतं ते नाही लिहायचं तर दुसर्यांना तुमच्याबद्दल काय वाटलं पाहिजे ते लिहायचं आहे.

२. तुम्हाला काय करायचं आहे ?
या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला तुमच्या करिअर बद्दल लिहायचं आहे. तुम्हाला तुमचं करिअर आहे तेच ठेवायचं आहे की बदलायचं आहे. किंवा ते ५ वर्षात कधी बदलणार आणि ते बदलण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल ते लिहा. त्यानंतर तुम्ही आता कोणत्या लेवलवर आहात. समजा तुम्हाला हेच करिअर पुढे घेऊन जायचं आहे तर आता तुम्ही कोणत्या लेवलवर आहात आणि ५ वर्षानंतर तुम्ही कुठल्या लेवलवर पोहोचायचे आहे. तुम्ही लिहू शकता की तुम्हाला कंपनीचा CEO बनायचं आहे पण ते या पुढील ५ वर्षात होणं शक्य आहे का ? तुम्ही आता कोणत्या लेवलवर आहात आणि जर ते ५ वर्षात शक्य नसेल तर ते नका लिहू. तर CEO बनणं हे स्वप्न झालं आणि जनरल मॅनेजर बनणं हे व्हिजन झालं. त्यामुळे तुम्हाला स्वप्नांपासून मार्ग मिळत नाही तर व्हिजन पासून मिळतो. स्वप्न डिस्ट्रक्ट करतो तर व्हिजन तुम्हाला मार्ग दाखवतो. त्यासोबत तुम्ही लिहा की तुम्हाला तुमचा वेळ कसा घालवायचा आहे. तुम्ही काय शिकणार आहात. काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकयच्या आहेत का? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे का ? किंवा कोणता देश पाहायचा आहे का ?  तुम्हाला फक्त काम काम नाही करायचं , फक्त पैसा पैसा नाही करायचं तुम्हाला फक्त करिअरचं नाही करायचं. तुमहाला तुमचं आयुष्य पण आहे आणि ते तुम्हाला जगायचं सुद्धा आहे.

३. तुम्हाला काय मिळवायचे आहे ?
त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे मला काय मिळवायचं आहे. यात तुम्ही फिजिकल किंवा भौतिक गोष्टी लिहू शकता. जस की, घर कोणतं घ्यायचं आहे, 1BHK , 2BHK , बंगला, गाडी , जमीन, कार, इ. घ्यायचे का? एक Crystalclear Image त्याबद्दल लिहा. त्यानंतर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप बद्दल लिहा. तुमहाला काय अपेक्षा आहेत? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहा. लग्न करायचं आहे की नाही? बायको किंवा नवऱ्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते लिहा.

अशाप्रकारे या ३ प्रश्नाची उत्तरे शांतपणे विचार करून लिहा. आणि ती उत्तरं लिहिल्यानंतर एकाच पेजवर लिहा. एका पानावर ३ कॉलम करा, काय मिळवायचं, काय करायचं आणि काय बनायचं. या ३ गोष्टी जर तुम्ही लिहिल्यात तर ते तुमचं डॉक्युमेंट तुमचं Vision  Statement तयार होईल. ते तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला नेहमी मदत करेल. तुम्ही जे काही लिहिलं आहे ते तुम्हाला रिव्युव्ह करायचे आहे, ३ किंवा ६ महिन्यांनी किंवा १ वर्षाने. आणि तुम्ही त्याच्यात थोडे थोडे बदल करू शकता.
मी तुम्हाला एक माझंच उदाहरण सांगतो, माझ्या Vision  Statement मध्ये माझं कुटुंब हे सगळ्यात पहिले आहे. आणि नंतर बिझनेस आहे. पैसा नंतर आहे. हे मी Vision  Statement मध्ये लिहिल्यामुळे मला ज्या काही चांगल्या ऑर्डर्स येतात ज्या मुंबई, पुणे किंवा नाशिक पासून लांब आहेत जिथे मला खूप प्रवास करावा लागतो, लांब राहावं लागतं, त्यामुळे मी अश्या ठिकाणच्या ऑफर्स घेतच नाही. कारण मला माझं कुटुंब सगळ्यात पाहिलं आहे. मला त्यांच्यापासून लांब राहायचं नाहीये. तर मित्रांनो मला ही कॅलॅरिटी मला Vision  Statement मधून आली. अशाप्रकारे तुमच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि नेहमीच मोटीव्हेट करेल.
आणि आता व्हिजन म्हणजे तुमच्या दृष्टीला आता ते दिसायला लागलं आहे तेव्हा तुमच्या आत असलेल्या मोटिव्हेशनच्या टाळ्याला एक छवी मिळते आणि ते कुलूप उघडलं जात. आणि मग या व्हिजन डॉक्युमेंट मुळे तुम्हाला जरी कधी स्टेजवर उभं राहून जोरात बोलणाऱ्या मोटिव्हेशनची गरज नाही तुम्हाला ते तुमच्या आतून मिळतं.  मला खात्री आहे की तुम्हाला हा छोटासा व्हिडीओ नक्की आवडला असेल. धन्यवाद !Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे
Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

आयुष्याची दिशा ठरवणारं Vision Statement कसं बनवायचं ? आयुष्याची दिशा ठरवणारं Vision Statement कसं बनवायचं ? Reviewed by netbhet on 22:27 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.